आंतरराष्ट्रीय

भारत-अमेरिका विश्वसनीय भागीदारीसाठी कटिबद्ध; पंतप्रधान मोदी-राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यात फोनवर चर्चा

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडून आल्यानंतर एकापाठोपाठ एक निर्णय घेण्याचा सपाटा लावला आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडून आल्यानंतर एकापाठोपाठ एक निर्णय घेण्याचा सपाटा लावला आहे. त्यांच्या निर्णयामुळे जगासमोर अनिश्चिततेचे संकट उभे राहिले असतानाच सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांच्यात फोनवर चर्चा झाली.

ट्रम्प अध्यक्ष बनल्यानंतर दोन्ही देशाच्या नेत्यांमधील ही पहिलीच चर्चा आहे. या पहिल्याच चर्चेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुसऱ्यांदा सत्तेत आल्याबद्दल ट्रम्प यांचे अभिनंदन केले. पंतप्रधान मोदी यांनी ‘एक्स’वरून याबाबतची माहिती दिली.

ते म्हणाले की, मी आपल्या प्रिय मित्रासोबत चर्चा केली. दोन्ही देशांनी विश्वसनीय भागीदारीसाठी कटिबद्ध राहण्याचे ठरवले आहे. तसेच दोन्ही देश आपल्या जनतेचे कल्याण, जागतिक शांतता, समृद्धी व सुरक्षेसाठी एकत्रित येऊन काम करतील, असे मोदी यांनी आपल्या ‘ट्विट’मध्ये नमूद केले.

ट्रम्प यांच्या आक्रमक भूमिकेमुळे जगभरात घबराट

पंतप्रधान मोदी यांनी ट्रम्प यांच्याशी चर्चा करताना ‘थांबा व वाट पाहा’ धोरण राबवले आहे. आपला दुसरा कार्यकाळ सुरू होण्यापूर्वीच ट्रम्प हे जगातील मीडियात चर्चेत आहेत. कॅनडापासून ग्रीनलँड, चीनपर्यंत रोखठोक विधानांमुळे त्यांनी आपले लक्ष वेधले आहे. कोलंबियावर त्यांनी उगारलेल्या कारवाईच्या बडग्यामुळे घबराट पसरून जगभरातील शेअर बाजार सोमवारी कोसळले. अवैध स्थलांतरितांबाबत त्यांनी कठोर पावले उचलली आहेत. मात्र, ‘एच-१ बी’ व्हिसाबाबत त्यांनी भारतीय तज्ज्ञांना दिलासा दिला आहे.

दारूवरील व्हॅट, परवाना शुल्कवाढीला विरोध; सोमवारी राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स बंद

नवी मुंबई विमानतळावरून सप्टेंबरअखेरीस टेक ऑफ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

Ahmedabad Plane Crash: इंधन पुरवठा बंद, विमान कोसळले; एएआयबीचा प्राथमिक अहवाल सादर, वैमानिकांमधील अखेरचा संवाद उघड

शरद पवार गटाचे नवे कॅप्टन शशिकांत शिंदे ? मंगळवारी प्रदेशाध्यक्ष पदाची घोषणा, जयंत पाटील पायउतार होणार

आयफोन, आयवॉचने कळणार स्त्री गर्भवती आहे का? कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत