पाण्याचे फुगे, जबरदस्तीचा रंग… यंदा चालणार नाही! होळीपूर्वी मुंबई पोलिसांचा कडक इशारा; गैरप्रकारांवर तात्काळ कारवाई

होळी आणि धुलीवंदनाचा सण शांततेत व सुरक्षित वातावरणात पार पडावा यासाठी मुंबई पोलिसांनी यंदा कडक मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. जबरदस्तीने रंग लावणे, पाण्याचे फुगे फेकणे, महिलांची छेडछाड...
पाण्याचे फुगे, जबरदस्तीचा रंग… यंदा चालणार नाही! होळीपूर्वी मुंबई पोलिसांचा कडक इशारा; गैरप्रकारांवर तात्काळ कारवाई
पाण्याचे फुगे, जबरदस्तीचा रंग… यंदा चालणार नाही! होळीपूर्वी मुंबई पोलिसांचा कडक इशारा; गैरप्रकारांवर तात्काळ कारवाई'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on

होळी आणि धुलीवंदनाचा सण शांततेत व सुरक्षित वातावरणात पार पडावा यासाठी मुंबई पोलिसांनी यंदा कडक मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. जबरदस्तीने रंग लावणे, पाण्याचे फुगे फेकणे, महिलांची छेडछाड, अश्लील कृत्ये किंवा सार्वजनिक सुव्यवस्थेला बाधा आणणारे प्रकार आढळल्यास तात्काळ कायदेशीर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा पोलिसांनी दिला आहे.

शहरभर वाढीव बंदोबस्त

मुंबईत होळी आणि धुलीवंदन मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. यंदाही सार्वजनिक ठिकाणे, गृहनिर्माण संस्था, प्रमुख चौक, समुद्रकिनारे आणि गर्दीची ठिकाणे येथे विशेष दक्षता घेतली जाणार आहे. सर्व पोलिस ठाण्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून वाढीव गस्त घालण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

वरिष्ठ अधिकारी स्वतः बंदोबस्ताची पाहणी करत असून, कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्वरित प्रतिसाद देण्यासाठी विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत.

पाण्याचे फुगे, जबरदस्तीचा रंग… यंदा चालणार नाही! होळीपूर्वी मुंबई पोलिसांचा कडक इशारा; गैरप्रकारांवर तात्काळ कारवाई
Thane : होळी-धुलिवंदन पार्श्वभूमीवर प्रशासन सज्ज; प्लास्टिक पिशव्यांवरील बंदी कागदावरच ?

झिरो टॉलरन्स भूमिका

'टाइम्स नाऊ'ने दिलेल्या वृत्तानुसार, सणाच्या आडून बेकायदेशीर कृत्ये, जबरदस्तीने रंग लावणे, छेडछाड किंवा सामाजिक-धार्मिक तणाव निर्माण करण्याचे प्रयत्न यापूर्वी आढळल्याने यंदा प्रशासनाने ‘झिरो टॉलरन्स’ भूमिका घेतली आहे. मोटारचालकांना त्रास देणे, पाण्याचे फुगे फेकणे किंवा सार्वजनिक ठिकाणी अश्लील वर्तन केल्यास तात्काळ कारवाई होईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

पाण्याचे फुगे, जबरदस्तीचा रंग… यंदा चालणार नाही! होळीपूर्वी मुंबई पोलिसांचा कडक इशारा; गैरप्रकारांवर तात्काळ कारवाई
Holi 2026: यंदा होलिका दहनाचा मुहूर्त अवघा १२ मिनिटांचा; २ की ३ मार्च? जाणून घ्या नेमकी तारीख अन् अचूक वेळ

होलिकादहनासाठी वृक्षतोडीवर कारवाई

होलिकादहनासाठी अनधिकृत वृक्षतोड केल्यास फौजदारी गुन्हा दाखल केला जाईल, असा इशाराही पोलिसांनी दिला आहे. सार्वजनिक सुरक्षितता आणि पर्यावरण संरक्षणाला प्राधान्य देण्यात येत असल्याचे प्रशासनाने नमूद केले.

संवेदनशील भागांत अतिरिक्त पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार असून सीसीटीव्ही देखरेख वाढवली जाणार आहे. दरम्यान, मुंबई पोलिसांनी नागरिकांना जबाबदारीने आणि पर्यावरणपूरक पद्धतीने होळी साजरी करण्याचे आवाहन केले आहे.

logo
marathi.freepressjournal.in