एक्स @Tamer012301
आंतरराष्ट्रीय

‘नासा’चे यान सूर्याजवळ ९८२ अंश तापमानातही सुरक्षित

‘नासा’ने सूर्याचा अभ्यास करण्यासाठी पाठवलेले ‘पार्कर सोलर प्रोब’ यान ९८२ अंश तापमानातही सुरक्षित राहिले आहे.

Swapnil S

वॉशिंग्टन : ‘नासा’ने सूर्याचा अभ्यास करण्यासाठी पाठवलेले ‘पार्कर सोलर प्रोब’ यान ९८२ अंश तापमानातही सुरक्षित राहिले आहे. हे यान १ जानेवारीपासून पृथ्वीवर माहिती पाठवण्यास सुरुवात करणार आहे.

‘नासा’ने सांगितले की, ‘पार्कर सोलर प्रोब’ यानाने २४ डिसेंबर रोजी सूर्यापासून ६१ लाख किमीवरून अंतरावर प्रवास केला. सूर्याच्या जवळ जाणारे हे पहिलेच यान ठरले आहे. ‘पार्कर सोलर प्रोब’ हे यान १ जानेवारीपासून आपली लोकेशन व मिळवलेली माहिती पाठवणार आहे. सूर्याजवळून जाताना या यानाचा वेग ६.९ लाख किमी प्रति तास होता. तेव्हा यानाने ९८२ अंश सेल्सिअस तापमान सहन केले. तरीही या यानाचे कोणतेही नुकसान झाले नाही.‘पार्कर सोलर प्रोब’ने २७ डिसेंबरला पृथ्वीवरील नासाच्या ‘जॉन्स हॉपकिन्स अप्लाईड फिजिक्स लॅबोरेटरी’ला संदेश पाठवला की, ते सुरक्षित आहे.

पृथ्वीपासून सर्वात जवळ असलेल्या सूर्याचा अभ्यास करण्याच्या हेतूने हे यान ‘नासा’ ने पाठवले आहे. हे यान सूर्याच्या बाहेरील वातावरणात पोहचल्याने वैज्ञानिकांना सूर्याबाबत अधिक माहिती मिळू शकेल. ‘पार्कर सोलर प्रोब’ हे यान नासाने १२ ऑगस्ट २०१८ रोजी सूर्याच्या दिशेने पाठवले. या मोहिमेद्वारे सौर हवेचा अभ्यास केला जाणार आहे.

Thane : ३२ मीटर शिडीच्या देखभालीवर ५.८५ कोटींचा खर्च; तीन वर्षांच्या दुरुस्तीचा प्रस्ताव, नव्या निविदेपर्यंत सहा महिन्यांची मुदतवाढ

Mumbai : मोनोरेल यंदाही यार्डातच; सुरक्षेबाबत MMRDA सावध

Mumbai : औषधांसाठी हवेत १२०० कोटी, मिळतात ३०० कोटी; पालिका रुग्णालयांत औषधांचा तुटवडा, नगरसेवकांनी BMC ला धारेवर धरले

देशात मुदतपूर्व निवडणुकीची शक्यता; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा अंदाज

Sindhudurg : आंबोलीत पुन्हा पट्टेरी वाघाचे दर्शन! स्थानिक युवकांनी टिपलेला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल