'एनव्हिडिया'च्या सीईओंवर चिनी उद्योजिकेची हेरगिरी; चीनकडून आरोपाचे खंडन, कंपनीची मार्केटमध्ये घसरण 
आंतरराष्ट्रीय

'एनव्हिडिया'च्या सीईओंवर चिनी उद्योजिकेची हेरगिरी; चीनकडून आरोपाचे खंडन, कंपनीची मार्केटमध्ये घसरण

कृत्रिम प्रज्ञा (एआय) क्षेत्रातील अग्रगण्य अमेरिकन कंपनी 'एनव्हिडिया'चे मुख्य कार्यकारी अधिकारी जेन्सन हुआंग एका संभाषणावरून वादात सापडले आहेत. चिनी उद्योजक महिलेशी असलेल्या कथित प्रेमप्रकरणातून चीनसाठी हेरगिरी केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता.

Swapnil S

नवी दिल्ली: कृत्रिम प्रज्ञा (एआय) क्षेत्रातील अग्रगण्य अमेरिकन कंपनी 'एनव्हिडिया'चे मुख्य कार्यकारी अधिकारी जेन्सन हुआंग एका संभाषणावरून वादात सापडले आहेत. चिनी उद्योजक महिलेशी असलेल्या कथित प्रेमप्रकरणातून चीनसाठी हेरगिरी केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. तथापि, या आरोपांचे चीनने सोमवारी खंडन केले. हे आरोप पूर्णपणे निराधार असल्याचे चीनी सरकारी प्रसार माध्यमांनी म्हटले आहे.

चिनी हेराबाबतचा हा कथित दावा पूर्णपणे निराधार असून, ही केवळ बदनामी आहे, असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गुओ जियाकुन यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. एनव्हिडियाचे सीईओ जेन्सन हुआंग हे परदेशी गुप्तचर यंत्रणेच्या रडारवर असल्याच्या वृत्तांची कंपनीच्या संचालक मंडळाने चौकशी सुरू केल्याची घोषणा केल्यानंतर चीनने हे निवेदन दिले आहे.

ट्रम्प यांच्याकडून हुआंग यांची पाठराखण

या प्रकरणामुळे 'एनव्हिडिया'च्या समभागांत प्री-मार्केट व्यवहारांत ६ टक्क्यांहून अधिक घसरण झाली असून, कंपनीचे अब्जावधी डॉलर्सचे बाजारमूल्य कमी झाले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जेन्सन हुआंग यांचे समर्थन करत त्यांना 'सन्माननीय व्यक्ती' म्हटले असले, तरी या उच्चस्तरीय तपासामुळे जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून कंपनीच्या आगामी वाटचालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

ती महिला कोण?

जेन्सन हुआंग यांनीही आपले एका महिलेशी विवाहबाह्य संबंध असल्याचे आणि आपण आपल्या पत्नीशी प्रतारणा केल्याची कबुली दिली होती. मात्र त्यांनी त्या महिलेच्या नावाचा उल्लेख केला नव्हता. त्यावरून अमेरिकन गुप्तचर यंत्रणांनी असा संशय होता की, ही महिला चीनच्या गुप्तचर मोहिमेचा एक भाग म्हणून माहिती गोळा करत असावी. या सर्व घडामोडींनंतर 'एनव्हिडिया'च्या संचालक मंडळाने या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी सुरू केली आहे.

हेरगिरीसाठी वापर केल्याचा संशय

गेल्या वर्षी अमेरिकेने केलेल्या तपासात अॅलिस हुआंग या चिनी व्यावसायिक महिलेने जेन्सन हुआंग यांचा वापर हेरगिरीसाठी केल्याचा संशय आहे. त्यावेळी अॅलिस हुआंग या 'मेगास्पीड इंटरनॅशनल'मध्ये होत्या. जेन्सन हुआंग यांचे चिनी उद्योगपती महिला अॅलिस हुआंग यांच्याशी असलेल्या त्यांच्या कथित संबंधांबाबत अमेरिकन गुप्तचर यंत्रणांनी राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने चिंता व्यक्त केली होती.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

'गोकुळवर्चस्वा'चा आज फैसला; संघर्ष मोर्चात ८० हजार कोल्हापूरकर सहभागी, शासननियुक्त ४ संचालकांना मतदानाचा अधिकार

'रॉकेटबाजी'वर बंदी! आकाशात उडणारे फटाके फोडण्यास मनाई; गच्ची, गॅलरी, झोपडपट्ट्यांसह सार्वजनिक, खासगी ठिकाणी निर्बंध

Mumbai : जुहूमध्ये फटाक्यांच्या वादातून तरुणाची हत्या

भीषण आगीत सहा जणांचा मृत्यू; धाराशिवमध्ये दुकानाला लागलेल्या आगीत कुटुंबातील एकमेव बचावला

IND vs NZ 3rd ODI: पाडव्याला पावसाचे पारडे जड! भारताचा आज हॅमिल्टन येथे न्यूझीलंडविरुद्ध तिसरा एकदिवसीय सामना