Photo : X
आंतरराष्ट्रीय

पाकिस्तानच्या बलुचिस्तानमध्ये 'बीएलए'चा एकाचवेळी १२ शहरांवर हल्ला; पोलीस ठाण्यांसह सरकारी कार्यालयांवर कब्जा!

‘बलोच लिबरेशन आर्मी’ने बलुचिस्तान प्रांतातील अनेक शहरात एकाचवेळी हल्ला केला. त्यांनी हल्ला करून पोलीस ठाणे आणि सरकारी कार्यालयांवर कब्जा केला आहे.

Swapnil S

क्वेट्टा : बंडखोर ‘बलोच लिबरेशन आर्मी’ने (बीएलए) बलुचिस्तानमध्ये एकाचवेळी तब्बल १२ शहरांवर हल्ला केला असून त्यामुळे पाकिस्तानचे सैन्य पोस्ट सोडून पळून गेल्याचे वृत्त आहे. पाकिस्तानच्या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार आतापर्यंत या हल्ल्यात १० सुरक्षा कर्मचाऱ्यांना आपला जीव गमवावा लागला आहे, तर ५८ दहशतवाद्यांचा खात्मा केल्याचा दावा पाकिस्तान सरकारने केला आहे.

‘बलोच लिबरेशन आर्मी’ने बलुचिस्तान प्रांतातील अनेक शहरात एकाचवेळी हल्ला केला. त्यांनी हल्ला करून पोलीस ठाणे आणि सरकारी कार्यालयांवर कब्जा केला आहे. शनिवारी बलुचिस्तानमधील हल्ल्यात ‘बलोच लिबरेशन आर्मी’च्या जेयबंद गटाचा प्रामुख्याने सहभाग होता, त्यांनी ‘ऑपरेशन हेरॉफ फेज २’ सुरू केले. ‘बीएलए’ने अनेक पोलीस ठाणी आपल्या ताब्यात घेतली. बलोच बंडखोरांनी या अचानक केलेल्या हल्ल्यामुळे पाकिस्तानी लष्कर बॅकफूटवर आले आणि ते पोस्ट सोडून पळून गेले. बंडखोरांचे हे हल्ले पाकिस्तानी सुरक्षा दल आणि सरकारी सुविधांना टार्गेट करणारे होते. हा हल्ला मोठा मानला जात आहे, कारण १२ पेक्षा जास्त ठिकाणी हे हल्ले झाल्याचे वृत आहे.

बंडखोरांनी शनिवारी सकाळी राजधानी क्वेटामध्ये ६ वाजता हल्ले केले. हा हल्ला मोठ्या धमाक्यानंतर सुरू झाला. त्यानंतर दोन तास जोरदार गोळीबार आणि अनेक धमाके झाले. बलोच बंडखोरांनी क्वेटासोबतच पसनी, मस्तंग, नुश्की आणि ग्वादर जिल्ह्यात एकाचवेळी हल्ले केले. बंडखोरांनी बंदुकीने हल्ला केला तसेच अनेक ठिकाणी आत्मघातकी हल्लेही केले. सोशल मीडियावरही स्थानिक पत्रकारांनी अनेक दावे केले आहेत. बलुचिस्तानमधील अनेक शहरांत सशस्त्र बंडखोरांनी कब्जा केला.

अमेरिकी तळांवर हल्ले सुरूच ठेवू; इराणच्या सर्वोच्च नेतेपदी निवड झाल्यानंतर मोजतबांचे पहिलेच वक्तव्य, होर्मुझ सामुद्रधुनी बंदच राहणार!

भारत, चीनसह १६ देशांविरुद्ध ट्रम्प लावणार टॅरिफ; व्यापारी भागीदारांविरुद्ध चौकशी सुरू

गॅस टंचाईमुळे लग्न सोहळे अडचणीत; हॉल व्यावसायिकांवर कार्यक्रम पुढे ढकलण्याची वेळ

शिवसेना पक्ष, चिन्हाबाबतची सुनावणी पुन्हा लांबणीवर

आजचे राशिभविष्य, १३ मार्च २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत