आंतरराष्ट्रीय

Pakistan Karachi Fire: कराचीतील आरजे मॉलला भीषण आग ; 9 जणांचा होरपळू मृत्यू

कराचीच्या मुख्यमंत्र्यांना या संपूर्ण घटनेचा अहवाल सादर करण्यात आला आहे

नवशक्ती Web Desk

पाकिस्तामधील कराचीत रशीद मिन्हास रोडवर असलेल्या आरजे मॉलमध्ये आज (२५ नोव्हेंबर) रोजी भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत ९ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. कराची शहरातील स्थानिक रुग्णालये आणि पोलिसांनी डॉन न्यूजला दिलेल्या माहितीनुसार, रुग्णालयांमध्ये ९ मृतदेह आणण्यात आले आहेत.

कराचीच्या मुख्यमंत्र्यांना या संपूर्ण घटनेचा अहवाल सादर करण्यात आला आहे. वृत्तानुसार जिल्हा उपायुक्त अल्ताफ शेख यांनी सांगितले की आग लागल्यानंतर २२ लोकांना मॉलमधून वाचवण्यात यश आलं. दरम्यान यामध्ये जखमी झालेल्यांना जिना पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल सेंटर जेपीएणसीमध्ये हलवण्यात आलं. पण यात उपचारादरम्यान एका मृत्यू झाला.

आग लागलेली इमारत ही व्यवसायीक इमारत होती. इमारतीच्या आत शॉपिंग सेंटर्स, कॉल सेंटर्स आणि सॉफ्टवेअर हाऊस होते. अग्निशमन आणि बचाव विभागाच्या प्रवक्त्यांने एका निवेदनात दिलेल्या माहितीनुसार सकाळी ६: ३० वाजेच्या सुमारास त्यांनी घटनेची माहिती मिळाली. यानंतर त्यांनी तात्काळ अग्निशमन दलाच्या आठ गाड्या, दोन स्नॉर्कल्स आणि दोन बाऊझर घटनास्थळी पाठवले आणि आग आटोक्यात आणली. सिंधचे महानिरिक्षक रिफत मुख्तार यांनी जिल्ह्याच्या वरिष्ठ पोलीस अधीक्षकांना इमारतीत अडकलेल्या लोकांना वाचवण्याच्या सूचना दिल्या होत्या. तसंच त्यांनी अग्निशमन दलाला त्याठिकाणी पोहचायला कोणतीही अडचण येणार नाही, यासाठी सस्ता मोकळा करण्याचे देखील आदेश त्यांनी दिले होते.

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

मुंबई, दिल्ली मेट्रो शहरांचा झगमगाट आता संधीच्या नकाशावर मागे! आता Freshers साठी चेन्नई ठरतंय पगाराचा नवा 'हॉटस्पॉट'

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक