पाककडून 'तैमूर' क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी Photo : X
आंतरराष्ट्रीय

पाककडून 'तैमूर' क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

पाकिस्तानी हवाई दलाने ६०० किमी अंतरावरील लक्ष्य भेदण्यास सक्षम असलेल्या स्वदेशी बनावटीच्या 'तैमूर' क्षेपणास्त्र प्रणालीची यशस्वी चाचणी केली. रावळपिंडी येथून जारी केलेल्या निवेदनात लष्कराने म्हटले की, या प्रक्षेपणामुळे राष्ट्रीय हवाई आणि संरक्षण क्षमतांच्या प्रगतीत आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे.

Swapnil S

इस्लामाबाद : पाकिस्तानी हवाई दलाने ६०० किमी अंतरावरील लक्ष्य भेदण्यास सक्षम असलेल्या स्वदेशी बनावटीच्या 'तैमूर' क्षेपणास्त्र प्रणालीची यशस्वी चाचणी केली. रावळपिंडी येथून जारी केलेल्या निवेदनात लष्कराने म्हटले की, या प्रक्षेपणामुळे राष्ट्रीय हवाई आणि संरक्षण क्षमतांच्या प्रगतीत आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे.

'तैमूर एअर-लाँच्ड क्रूझ मिसाइल ६०० किमीपर्यंत उच्च अचूकतेने शत्रूच्या जमिनीवरील तसेच समुद्रातील लक्ष्यांवर हल्ला करण्यास सक्षम आहे. अत्याधुनिक दिशादर्शन आणि मार्गदर्शन प्रणालीने सुसज्ज असलेले 'तैमूर' अतिशय कमी उंचीवर उड्डाण करण्यासाठी डिझाइन करण्यात आले असून, त्यामुळे ते शत्रूच्या हवाई आणि क्षेपणास्त्र संरक्षण प्रणालींना प्रभावीपणे चकवू शकते.

या क्षेपणास्त्राच्या अचूक हल्ल्याच्या क्षमतेने पाकिस्तान हवाई दलाची पारंपरिक प्रतिबंधक शक्ती आणि कार्यात्मक लवचिकता लक्षणीयरित्या वाढवते, तसेच देशाची एकूण संरक्षण स्थिती अधिक बळकट होणार आहे.

या प्रक्षेपणावेळी पाकिस्तान सशस्त्र दलांचे वरिष्ठ अधिकारी तसेच या प्रगत शस्त्र प्रणालीच्या विकासात मोलाची भूमिका बजावणारे नामांकित शास्त्रज्ञ आणि अभियंते उपस्थित होते.

Mobile SIM Rules: आजपासून सिम कार्ड खरेदीचा नवा नियम लागू! एका व्यक्तीच्या नावावर फक्त 'इतकेच' नंबर चालणार

साखरेची दर घसरण सुरू; सरकारच्या साठा मर्यादेचा परिणाम, साखर फॅक्टरी फेडरेशनचे अध्यक्ष नाईकनवरे यांची माहिती

Mumbai : 'आम्ही शाळेतच गेलो नाही, मग मराठी कशी बोलणार?'; भाषेच्या सक्तीविरोधात रिक्षाचालकांचा ३ दिवसांचा संप

राज्यांनी PNG ला गती द्यावी; केंद्र सरकारचा राज्यांना आग्रह, जिल्हास्तरीय अधिकारी नेमा

दिल्लीत मुसळधार पावसाचा तडाखा; खराब हवामानामुळे २६ उड्डाणे रद्द, १५ विमानांचे बदलले मार्ग