आंतरराष्ट्रीय

बिटकॉइनसह सर्व क्रिप्टोकरन्सी जीएसटीच्या कक्षेत आणण्याची तयारी सुरु

क्रिप्टोकरन्सीतील गुंतवणूकदारांना बसणार मोठा दणका बसणार

वृत्तसंस्था

देशाचा अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी क्रिप्टोकरन्सीवर ३० टक्के कर आणि टीडीएस लागूर करण्याची घोषणा करत गुंतवणूकदारांना धक्का दिला होता. तर आता बिटकॉइनसह सर्व क्रिप्टोकरन्सी जीएसटीच्या कक्षेत आणण्याची तयारी सुरु आहे आणि जीएसटी परिषद या डिजिटल चलनांवर २८ टक्के दराने कर लावण्याचा विचार करत आहे.

कॅसिनो-लॉटरी समतुल्य जीएसटी

एका अहवालात म्हटले आहे की, देशातील क्रिप्टोकरन्सी गुंतवणूकदारांना आणखी एका समस्येचा सामना करावा लागू शकतो. ३० टक्के करानंतर आता वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) कौन्सिल क्रिप्टोकरन्सीवरही मोठा कर लावण्याच्या तयारीत आहे. क्रिप्टोकरन्सीमधील गुंतवणूक म्हणजे कॅसिनो, सट्टेबाजी आणि लॉटरीशी समतुल्य असल्याने त्यांच्यावर आकारल्या जाणाऱ्या सध्याच्या जीएसटीच्या बरोबरीचा जीएसटी आकारला जाणार आहे. अहवालानुसार, सध्या जीएसटी कौन्सिलच्या पुढील बैठकीची तारीख ठरलेली नाही. परंतु, हा ठराव बैठकीत मंजूर झाल्यास विक्री आणि खरेदी तसेच क्रिप्टोसारख्या सेवांवर २८ टक्के जीएसटी आकारला जाण्याची शक्यता आहे.

आधीच लागू असलेला कर वगळता

हा २८ टक्के जीएसटी क्रिप्टोकरन्सीच्या व्यवहारातून मिळणाऱ्या उत्पन्नावर आधीपासून आकारलेल्या ३० टक्के कराच्या व्यतिरिक्त असेल. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी फेब्रुवारीमध्ये केंद्रीय अर्थसंकल्प २०२२-२३ दरम्यान व्यवहारांवर एक टक्के दराने टीडीएसच्या नियमासह या व्यवहारांमधून मिळणाऱ्या उत्पन्नावर ३० टक्के कर लागू करण्याची घोषणा केली होती. हा नियम १ एप्रिल २०२२ पासून लागू करण्यात आला आहे.

शिवरायांचे किल्ले ‘युनेस्को’च्या जागतिक वारसास्थळ यादीत

मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्याचा कॅनडातील कपिल शर्माच्या कॅफेवर गोळीबार

सरकारची इलेक्ट्रिक ट्रक प्रोत्साहन योजना सुरू; PM e-Drive अंतर्गत ९.६ लाख रु.मिळणार

टेस्ला पुढील आठवड्यात भारतात प्रवेश करण्यास सज्ज; वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये पहिले शोरूम सुरू करणार

अजित पवारांची माफी मागा! लक्ष्मण हाके यांना राष्ट्रवादीची नोटीस