File Photo 
आंतरराष्ट्रीय

पैगंबर वादग्रस्त विधान : अल कायदाचा मुंबईसह 'या' राज्यांना इशारा

मोहंमद पैगंबर यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा बदला घेण्यासाठी भारतावर आत्मघाती हल्ले करण्याची धमकी

वृत्तसंस्था

मोहंमद पैगंबर यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा बदला घेण्यासाठी भारतावर आत्मघाती हल्ले करण्याची धमकी अल कायदा या अतिरेकी संघटनेने दिली आहे. दिल्ली, महाराष्ट्र, यूपी आणि गुजरातमध्ये आत्मघाती हल्ले करण्याची धमकी अतिरेक्यांनी दिली आहे. “भगव्या अतिरेक्यांनी दिल्ली, मुंबई आणि गुजरातमध्ये आपल्या अंताची प्रतीक्षा करावी. ज्यांनी पैगंबरांचा अवमान केला, आम्ही त्यांची ह्त्या करू,” अशा शब्दांत अल कायदाने ही धमकी दिली आहे.

पाकिस्तानातील तालिबाननंतर धमकी देणारी अल कायदा ही दुसरी संघटना ठरली आहे. उल्लेखनीय म्हणजे मोहंमद पैगंबर यांचे कार्टून छापल्यानंतर अल कायदाने पॅरिसमध्ये चार्ली हेब्दो मॅग्झिनच्या कार्यालयावर हल्ला केला होता. यात १२ जणांचा मृत्यू झाला होता. दरम्यान, काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघांच्या कार्यालयांना बॉम्बने उडवण्याची धमकी देणाऱ्या आरोपीस तमिळनाडूच्या पुडुकुडीतून अटक करण्यात आली आहे. आरोपी राज मोहम्मदने सोमवारी संघाच्या ६ कार्यालयांना बॉम्बने उडवण्याची धमकी दिली होती. त्यात लखनऊची दोन कार्यालये होती.

ठाकरे सेना-मनसे एकत्र? नव्या युतीची आठवडाभरात होणार घोषणा

विधिमंडळातील संख्याबळात महायुतीला फायदा; विरोधी पक्षनेतेपदाबाबत काँग्रेस अडचणीत

अजित पवारांना हवीय महायुती? राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मुख्यमंत्र्यांना भेटणार

दीड लाखाहून अधिक विद्यार्थ्यांना पदवी मिळणार; मुंबई विद्यापीठाचा दीक्षान्त समारंभ १७ जानेवारीला

Mumbai : पाच दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा; धारावी, अंधेरी पूर्व, वांद्रे, खार पूर्व भाग प्रभावित; BMC जलवाहिनी जोडण्याचे काम करणार