आंतरराष्ट्रीय

पुतिन यांच्या निकटवर्तीयाची मॉस्कोमध्ये हत्या; रशियन जनरलचा कार बॉम्बस्फोटाद्वारे 'गेम'

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचे निकटवर्तीय आणि सैन्याच्या ऑपरेशनल प्रशिक्षण विभागाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल फॅनिल सर्वारोव यांचा थेट कार बॉम्बस्फोटात मृत्यू झाला आहे. लेफ्ट. जन. फॅनिल सर्वारोव यांच्या मृत्यूनंतर रशियात खळबळ उडाली आहे.

Krantee V. Kale

मॉस्को : रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचे निकटवर्तीय आणि सैन्याच्या ऑपरेशनल प्रशिक्षण विभागाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल फॅनिल सरवारोव यांचा थेट कार बॉम्बस्फोटात मृत्यू झाला आहे. लेफ्ट. जन. फॅनिल सर्वारोव यांच्या मृत्यूनंतर रशियात खळबळ उडाली आहे.

पुतिन यांच्या सैन्याच्या ऑपरेशनल प्रशिक्षण विभागाचे प्रमुख फॅनिल सरवारोव यांचा मृत्यू झाला. हा हल्ला संशयास्पद झाला असून लेफ्टनंट जनरल फॅनिल सरवारोव यांनाच टार्गेट करून करण्यात आला. फॅनिल सर्वारोव रशियन सशस्त्र दलांमध्ये एका अत्यंत महत्वाच्या पदावर कार्यरत होते. लष्कराच्या प्रशिक्षणाची आणि युद्धाभ्यासाच्या तयारीची संपूर्ण जबाबदारी त्यांच्याकडेच होती.

युक्रेनसोबत युद्ध सुरू असताना हे घडल्याने संशय व्यक्त केला जात आहे. ज्यावेळी फॅनिल सर्वारोव एका अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये होते, त्यावेळी हा स्फोट झाला. या हल्ल्यामागे युक्रेनियन गुप्तचर संस्था असल्याचा थेट आरोप करण्यात आला. मात्र, या हल्ल्यावर अजून तरी युक्रेन सरकारने मौन बाळगले आहे. रशियाची सैन्य ताकद कमी करण्यासाठी आणि त्यांना युद्धाला व्यवस्थितपणे सामोरे जाता येऊ नये, म्हणूनच हा हल्ला घडवून आणल्याचे बोलले जात आहे.

'बॅचलर्सना परवानगी नाही' म्हणत मालकिणीलाच घर खाली करायला सांगितलं; सोसायटी बोर्ड मेंबर्सना २२ वर्षांच्या तरुणीने शिकवला धडा

ठाकरे बंधूंचं अखेर ठरलं! वेळ आणि स्थळही सांगितलं; संजय राऊत यांची पोस्ट पुन्हा चर्चेत

राज ठाकरे-उद्धव ठाकरे युतीवर सुप्रिया सुळेंचे भाष्य; "ठाकरे बंधू एकत्र आले तर...

गेमिंग इंडस्ट्रीला मोठा धक्का! भरधाव Ferrari चा भीषण अपघात; Call of Duty गेमचे सहनिर्माते विन्स झॅम्पेला यांचा मृत्यू - Video व्हायरल

BCCIचा मोठा निर्णय! महिला खेळाडूही होणार मालामाल; देशांतर्गत क्रिकेटपटूंच्या मॅच फीमध्ये दुप्पट वाढ