पुतिन हे झेलेन्स्कींशी चर्चा करतील! सौदीतील चर्चेनंतर रशियाचे स्पष्टीकरण संग्रहित छायाचित्र
आंतरराष्ट्रीय

पुतिन हे झेलेन्स्कींशी चर्चा करतील! सौदीतील चर्चेनंतर रशियाचे स्पष्टीकरण

रियाध : रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन हे गरज पडल्यास युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदोमीर झेलेन्स्की यांच्याशी चर्चा करण्यास तयार आहेत, असे स्पष्टीकरण रशियाने केले आहे.

Swapnil More

रियाध : रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन हे गरज पडल्यास युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदोमीर झेलेन्स्की यांच्याशी चर्चा करण्यास तयार आहेत, असे स्पष्टीकरण रशियाने केले आहे.

तीन वर्षांपासून सुरू असलेले रशिया-युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुढाकार घेतला आहे.

क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव यांनी सांगितले की, तोडगा काढण्यासाठी कायदेशीर चर्चा गरजेची आहे. झेलेन्स्कींच्या वैधतेबाबत आमच्या मनात शंका आहे. राष्ट्राध्यक्ष म्हणून झेलेन्स्की यांचा कार्यकाळ गेल्यावर्षी संपला आहे. युक्रेनी कायद्यानुसार, मार्शल लॉ सुरू असल्याने राष्ट्राध्यक्ष निवडणूक घेण्याची आवश्यकता नाही. तसेच सुरक्षेच्या व्यापक मुद्याबाबत विस्तृत चर्चा केल्याशिवाय युक्रेन युद्धावर तोडगा निघू शकत नाही. तसेच युक्रेनला युरोपियन महासंघात सामील होण्यास रशिया विरोध करणार नाही. मात्र, युक्रेनला ‘नाटो’मध्ये सामील होण्यास आमचा विरोध राहील, असे पेस्कोव म्हणाले.

युरोपियन महासंघात सामील होण्यास रशियाची आपत्ती नाही. पण, सुरक्षेचे मुद्दे व सैन्य आघाडीची बाब येते, तर ती वेगळी गोष्ट आहे. आमचा स्वत:चा दृष्टिकोन वेगळा असून तो सार्वजनिक आहे, असे पेस्कोव यांनी सांगितले.

Maratha Reservation : मराठा वादळाने मुंबईला हादरा; आता माघार नाही – मनोज जरांगेंचा निर्धार; पावसामुळे आंदोलकांचे प्रचंड हाल

मुंबईला पावसाने झोडपले; पुढील तीन दिवस मध्यम पावसाची शक्यता

महायुतीच्या घोडचुकीमुळे मुंबईकर वेठीस; मराठा आंदोलनामुळे मुंबईत गोंधळाची स्थिती

आंदोलनामुळे हॉटेल, दुकाने बंद; आंदोलकांची झाली गैरसोय, सोबत १५ दिवसांची शिदोरी...

CSMT टाळण्याचे प्रवाशांना रेल्वेचे आवाहन; मराठा आरक्षण आंदोलनामुळे दक्षिण मुंबई ठप्प