'वडील जिवंत असल्याचा पुरावा द्या !' इम्रान खान यांच्या मुलाची सोशल मीडिया पोस्ट चर्चेत 
आंतरराष्ट्रीय

'वडील जिवंत असल्याचा पुरावा द्या !' इम्रान खान यांच्या मुलाची सोशल मीडिया पोस्ट चर्चेत

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या मृत्यूच्या अफवांमुळे खळबळ उडाली असतानाच इम्रान यांचा मुलगा कासिम खान यांनी त्यांचे वडील जिवंत असल्याचा पुरावा मागितला असून त्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदाय आणि आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनांकडेही हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे.

Swapnil S

न्यू यॉर्क : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या मृत्यूच्या अफवांमुळे खळबळ उडाली असतानाच इम्रान यांचा मुलगा कासिम खान यांनी त्यांचे वडील जिवंत असल्याचा पुरावा मागितला असून त्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदाय आणि आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनांकडेही हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे.

दरम्यान, इम्रान खान यांच्या बहिणींनी दावा केला आहे की, त्यांना आपल्या भावाला भेटण्यापासून सुमारे २३ दिवसांपासून रोखले जात आहे. तर इम्रान खान यांच्या मृत्यूच्या बातम्या खोट्या आहेत, असे तुरुंग प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एका पोस्टमध्ये कासिम खान यांनी म्हटले आहे की, त्यांच्या वडिलांना अटक होऊन सुमारे ८४५ दिवसांहून अधिक काळ लोटला आहे. कासिम खान यांनी दावा केला की, गेल्या दीड महिन्यांपासून त्यांचे वडील आणि कुटुंबीयांचा कोणताही संपर्क होऊ दिला नाही. त्यांना डेथ सेलमध्ये ठेवण्यात आले आहे. कासिम यांनी आंतरराष्ट्रीय समुदाय आणि आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनांकडेही हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे.

कासिम यांनी अनेक मागण्या मांडल्या आहेत. यामध्ये त्यांच्या वडिलांच्या जिवंत असल्याचा पुरावा, न्यायालयाच्या आदेशानुसार भेटीची परवानगी, अमानवीय एकांतवासाचा अंत इत्यादींचा समावेश आहे.

नवी मुंबई विमानतळावरून FLY91ने घेतली भरारी! 'या' ४ ठिकाणी थेट विमानसेवा; पहिल्या फ्लाइटचं खास स्वागत, VIDEO

'ऑक्टोबर हिट'चा सिंधुदुर्गाला तडाखा; वाढत्या उष्णतेने नागरिक हैराण; तापमान ३४ ते ३६ अंश दरम्यान

Pune : प्रेमाच्या जाळ्यात ओढून डॉक्टरकडून १४ लाखांची खंडणी उकळली; महिलेविरोधात गुन्हा दाखल

पतधोरण समितीची बैठक सुरू; पाव टक्के व्याजदर वाढण्याची शक्यता

...तर पुणे शहर ठप्प होईल; आमदार रोहित पवार यांचा इशारा