Russia Plane Crash : रशियात लष्करी विमान अपघातात २९ जणांचा मृत्यू प्रातिनिधिक छायाचित्र
आंतरराष्ट्रीय

Russia Plane Crash : रशियात लष्करी विमान अपघातात २९ जणांचा मृत्यू

रशियाचे एएन-२६ हे लष्करी वाहतूक विमान बुधवारी एका डोंगरकड्यावर कोसळून झालेल्या दुर्घटनेमध्ये २९ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.

Swapnil S

क्रिमिया: रशियाचे एएन-२६ हे लष्करी वाहतूक विमान बुधवारी एका डोंगरकड्यावर कोसळून झालेल्या दुर्घटनेमध्ये २९ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार बुधवारी सकाळी रशियाच्या सदर विमानाचा संपर्क तुटला आणि त्यानंतर तांत्रिक बिघाडामुळे ते क्रिमियामध्ये एका डोंगराच्या कडाव्यावर कोसळले.

मंगळवारी संपर्क तुटला

मंगळवारी स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी ६ वाजता क्रिमियाला जाणाऱ्या या विमानाशी संपर्क तुटला. तास या वृत्तसंस्थेकडून ही माहिती मिळाली आहे. क्रिमिया हे बेट काळ्या समुद्रच्या किनारपट्टीवर असून २०१४मध्ये रशियाने युक्रेनकडून ते ताब्यात घेतले होते.

संरक्षण मंत्रालयाने अहवाल दिला की शोध पथकाला आपत्तीचे ठिकाण सापडले आहे, असे वृत्तसंस्थेने म्हटले आहे. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, विमानातील सहा क्रू मेंबर्स आणि २३ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.

विमानात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. लष्कराचे एक पथक सध्या या ठिकाणी काम करत आहे. एएन-२६ हे विमान १९६० पासून सेवेत आहे. विमानकंपनीकडून गेल्या अनेक वर्षांत मालवाहतुकीसाठीही या विमानाचा वापर केला जात होता. दरम्यान, अनेक प्राणघातक हल्ल्यांमध्येही या विमानाचा वापर केला गेला होता.

युक्रेनकडून हल्ला?

दरम्यान, या विमान अपघातात युक्रेनचा काही संबंध असल्याची शंका व्यक्त केली जात आहे. परंतु, सुरू असलेल्या तपासात काही संशयास्पद वस्तू आढळून आल्या नसल्याने ती शक्यता नाकारण्यात येता आहे. त्यामुळे तांत्रिक बिघाडामुळेच हा अपघाता झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

अनेक अपघात

एएन-२६ या विमानाचे गेल्या दशकात अनेक अपघात झाले आहेत. २०२०मध्ये दक्षिण सुदानमध्ये विमान कोसळून पाच रशियन नागरिकांसह आठ जणांचा मृत्यू झाला होता. दरम्यान, त्याच वर्षी युक्रेनमध्ये प्रशिक्षणावेळी आणखी एक विमान कोसळून विमानातील २६ जणांचा मृत्यू झाला होता. तसेच, २०२७मध्ये पश्चिम आफ्रिकेतील आयव्हरी कोस्टवर लँडिंगदरम्यान एएन-२६ विमान कोसळून झालेल्या अपघातात ४ जणांचा मृत्यू झाला होता.

Mumbai : मालमत्ता कराची विक्रमी वसुली! ७ हजार ६१० कोटी ९० लाख रुपये करसंकलन; एकाच दिवशी ३९९ कोटींची वसुली

Goa Nightclub Fire Update : गोव्यातील नाईटक्लब आग प्रकरण; लुथ्रा बंधूंना जामीन मंजूर, तरीही तुरुंगातच राहावे लागणार

महिलांची वेतनवाढ पुरुषांपेक्षा जास्त, परंतु पगार कमी; देशात बेरोजगारी घटली, PLFS सर्वेक्षण २०२५ मधील दावा

रिट्रीट सेरेमनीच्या वेळेत बदल; अटारी-वाघा सीमेवर आता दररोज सायं. ५:३० ते ६ वाजेपर्यंत रिट्रीट

कामगार निवृत्ती वयोमर्यादा वाढीचा प्रस्ताव फेटाळला; नवी मुंबई महापालिकेला राज्य सरकारचा दणका