आंतरराष्ट्रीय

रशियाने अफगाणिस्तानातील तालिबान सरकारला दिली अधिकृतपणे मान्यता

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी अफगाणिस्तानातील तालिबान सरकारला अधिकृतपणे मान्यता दिली आहे. रशियन सरकारने तालिबानने नियुक्त केलेले नवीन अफगाण राजदूत गुल हसन यांना स्वीकारले आहे. रशियाच्या या निर्णयामुळे अफगाणिस्तानमध्ये २०२१ मध्ये तालिबानच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेवर आल्यानंतर रशिया अधिकृतपणे मान्यता देणारा पहिला देश ठरला आहे.

Swapnil S

मॉस्को : रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी अफगाणिस्तानातील तालिबान सरकारला अधिकृतपणे मान्यता दिली आहे. रशियन सरकारने तालिबानने नियुक्त केलेले नवीन अफगाण राजदूत गुल हसन यांना स्वीकारले आहे. रशियाच्या या निर्णयामुळे अफगाणिस्तानमध्ये २०२१ मध्ये तालिबानच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेवर आल्यानंतर रशिया अधिकृतपणे मान्यता देणारा पहिला देश ठरला आहे.

या संदर्भात रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने एक निवदेन जारी केले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, आम्हाला विश्वास आहे की इस्लामिक अमीरात ऑफ अफगानिस्तानच्या सरकारला अधिकृत मान्यता देण्याच्या निर्णयामुळे दोन्ही देशांतील विविध क्षेत्रात द्विपक्षीय सहकार्याच्या विकासाला चालना मिळेल. दरम्यान, रशियाचे उपपरराष्ट्र मंत्री आंद्रे रुडेन्को यांनी मॉस्कोमध्ये झालेल्या एका कार्यक्रमानंतर अफगाण राजदूत गुल हसन यांची भेट घेत त्यांचे प्रमाणपत्र स्वीकारले असल्याचे वृत्त आहे.

एका रशियन वृत्तसंस्थने शेअर केलेल्या फोटोंमध्ये मॉस्कोमधील अफगाण दूतावासात तालिबानचा ध्वज फडकवण्यात आला होता. दरम्यान, काबूलमधील तालिबान सरकारमधील अधिकाऱ्यांनी रशियाच्या या निर्णयाचे कौतुक करीत या निर्णयामुळे दोन्ही देशातील संबंध मजबूत होण्यास मदत होईल असे म्हटले आहे. तसेच तालिबानचे परराष्ट्र मंत्री अमीर खान मुत्ताकी यांनी म्हटले आहे की, हा आमच्या संबंधांच्या इतिहासातील हा एक महत्त्वाचा टप्पा आहे.

अफगानिस्तानमध्ये ऑगस्ट २०२१ मध्ये तालिबानने सत्ता हाती घेतली होती. तेव्हापासून रशियाने काबूलमधील आपला दूतावास खुला ठेवला होता. ते तालिबान नेत्यांशी संपर्क साधत होते. रशियन सरकारने म्हटले आहे की, त्यांना व्यापार आणि आर्थिक क्षेत्रात सहकार्याच्या महत्त्वपूर्ण संधी दिसत आहेत. तसेच ऊर्जा, वाहतूक, शेती आणि पायाभूत सुविधांमधील प्रकल्पांवर काम करण्याची अपेक्षा आहे. शिक्षण, संस्कृती, क्रीडा आणि मानवतावादी कार्यात मजबूत संबंध निर्माण करण्याच्या योजनांचाही उल्लेख रशियाने केला आहे.

कोकणवासीयांना यंदाही ‘बाप्पा’ पावणार; कोकणात जाणाऱ्यांना टोल माफी

श्रावणात पावसाची १५ दिवस सुट्टी; १५ ऑगस्टनंतरच पावसाची बॅटिंग, भारतीय हवामान विभागाची माहिती

मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर थेट नियंत्रणाचा मार्ग मोकळा

ऑपरेशन सिंदूरबाबत आक्षेपार्ह मजकूर नडला; FIR रद्द करण्यास हायकोर्टाचा नकार

IND vs ENG : "तू आम्हाला शिकवू नकोस"; खेळपट्टी पाहण्यास अटकाव करणाऱ्या ओव्हलच्या पिच क्युरेटरवर संतापला गौतम गंभीर | Video