रशियाचा युक्रेनवर भीषण क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ला; १६ ठार, जनजीवन विस्कळीत (Photo-X)
आंतरराष्ट्रीय

रशियाचा युक्रेनवर भीषण क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ला; १६ ठार, जनजीवन विस्कळीत

रशियाने युक्रेनमधील नागरी वस्त्यांना लक्ष्य करत शेकडो ड्रोन आणि डझनावारी क्षेपणास्त्रांचा भीषण मारा केला आहे.

Swapnil S

कीव : रशियाने युक्रेनमधील नागरी वस्त्यांना लक्ष्य करत शेकडो ड्रोन आणि डझनावारी क्षेपणास्त्रांचा भीषण मारा केला आहे. दिवसभर आणि रात्रभर सुरू असलेल्या या हल्ल्यात किमान १६ जणांचा मृत्यू झाला असून ८० हून अधिक नागरिक जखमी झाले आहेत. गेल्या दोन आठवड्यांतील हा रशियाचा सर्वात मोठा हवाई हल्ला मानला जात आहे.

रशियाने सुमारे ७०० ड्रोन आणि अनेक बॅलिस्टिक व क्रूझ क्षेपणास्त्रांनी युक्रेनवर हल्ला चढवला. युक्रेनच्या हवाई दलाने दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी ७०३ लक्ष्यांपैकी ६६७ ड्रोन आणि क्षेपणास्त्रे पाडली आहेत. मात्र, तरीही २० ड्रोन आणि १२ क्षेपणास्त्रे विविध २६ ठिकाणी कोसळली, ज्यामुळे मोठा विध्वंस झाला.

राजधानी कीवमध्ये एका १२ वर्षांच्या मुलासह ४ जणांचा मृत्यू झाला. १७ अपार्टमेंट इमारती, १० खाजगी घरे, एक हॉटेल आणि शॉपिंग मॉलचे मोठे नुकसान झाले आहे. दक्षिण बंदर शहर ओडेसा येथे ९ जणांचा बळी गेला असून २३ जण जखमी झाले आहेत. निप्रो प्रदेशात तीन महिलांचा मृत्यू झाला, तर झापोरिझियामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची नोंद आहे.

एअर डिफेन्स

हा हल्ला अशा वेळी झाला आहे जेव्हा राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की जर्मनी, नॉर्वे आणि इटलीच्या ४८ तासांच्या दौऱ्यावरून परतले आहेत. युक्रेनला सध्या रशियन हल्ले रोखण्यासाठी प्रगत हवाई संरक्षण प्रणालीची नितांत गरज आहे. झेलेन्स्की यांनी एक्सवर म्हटले की, अशा हल्ल्यांमुळे हे सिद्ध होते की, रशियावरील जागतिक निर्बंध शिथिल करण्याची कोणतीही गरज नाही.

रस्त्याच्या कामावरून प्रश्न विचारताच तरुणाच्या लगावली कानशिलात; मंत्री प्रवेश वर्मांचा Video सोशल मीडियावर व्हायरल

NCMC Card : अजून कार्ड काढलं नाही? १ ऑक्टोबरपूर्वी करा नोंदणी; कुठे अन् कशी करायची? वाचा संपूर्ण प्रक्रिया

Video : आशुतोष रांकांसह CJP चे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात; सुटका न झाल्यास आसामला जाणार, अभिजीत दिपकेंचा इशारा

Mumbai : अनंत चतुर्दशीला नाही तर अंगारकी संकष्टीला होते अंधेरीच्या राजाचे विसर्जन; जाणून घ्या खास परंपरा

LPU Students Protest : बलात्काराच्या अफवेने विद्यार्थ्यांचा उद्रेक; कॅम्पसमध्ये जाळपोळ, महामार्गही रोखला, Video