AFP
आंतरराष्ट्रीय

भारताने ठरवल्यास रशिया-युक्रेन युद्ध थांबू शकते; युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांचे आवाहन

भारताने ठरवल्यास रशिया-युक्रेन युद्ध थांबू शकते, असे आवाहन युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी केले. रशियन अर्थव्यवस्थेत भारताचे मोठे योगदान आहे. भारताने रशियाकडून तेल घेणे बंद केल्यास रशिया शस्त्रसंधीला तयार होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Swapnil S

कीव्ह : भारताने ठरवल्यास रशिया-युक्रेन युद्ध थांबू शकते, असे आवाहन युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी केले. रशियन अर्थव्यवस्थेत भारताचे मोठे योगदान आहे. भारताने रशियाकडून तेल घेणे बंद केल्यास रशिया शस्त्रसंधीला तयार होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

पंतप्रधान मोदी यांच्यासोबत द्विपक्षीय बैठकीनंतर जेलेन्स्की म्हणाले की, रशियाकडून भारत तेल खरेदी करत असल्याची चर्चा आम्ही केली. या युद्धामुळे जगाने रशियावर मोठ्या प्रमाणावर निर्बंध लादले आहेत. मात्र, भारताचे दरवाजे उघडे आहेत. भारताने रशियाकडून तेल आयात करणे बंद केल्यास पुतीन यांच्यासाठी मोठे आव्हान असेल. युद्ध सुरू असताना भारत व चीनकडून पुतीन यांना अब्जावधी रुपयांची मदत मिळत आहे, असेही ते म्हणाले.

रशिया-युक्रेन युद्धाबाबत संयुक्त राष्ट्रांच्या प्रस्तावाबाबत भारताच्या भूमिकेबाबत झेलेन्स्की म्हणाले की, भारताने याबाबत आम्हाला साथ दिली नाही, याबाबत आम्हाला खंत आहे. भविष्यात हा प्रस्ताव मांडण्यापूर्वी आम्ही भारताशी चर्चा करण्याचा प्रयत्न करू. भारताने आमची बाजू उचलून धरावी. भारत हे युद्ध थांबवण्यासाठी महत्त्वाची भूमिका पार पाडू शकतो, असे ते म्हणाले.

'अपघात व्हायची वाट पाहताय का?' अंधेरी स्थानकावर प्रचंड गर्दी; महिनाभराच्या WR ब्लॉकमुळे प्रवाशांचे हाल, Video व्हायरल

"वाटलेल्या नोटांमुळे 'नोटा'चाही अधिकार गेला" ; राज ठाकरे-उद्धव ठाकरे यांच्या संयुक्त मुलाखतीचा टीझर व्हिडिओ लाँच

भारतातच खेळा, नाहीतर गूण गमवा! ICC चा बांगलादेशच्या मागणीला नकार, सुरक्षेला धोक्याचा दावाही फेटाळला - रिपोर्ट

मोदी-शहांविरोधात घोषणाबाजी महागात! 'त्या' विद्यार्थ्यांचे तात्काळ निलंबन होणार; JNU चा इशारा; एफआयआरही दाखल

BMC Election : मुंबईच्या आखाड्यात ८४ प्रभागांत तिरंगी; ११८ ठिकाणी चौरंगी लढती