रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन हे गंभीर आजाराने ग्रस्त आहेत. त्यांना रक्ताचा कर्करोग झाला असून त्यांची जगण्याची आशा फार थोडी आहे, अशी माहिती त्यांचे निकटवर्तीय मित्राने दिली.
पुतीन यांना कोणत्या स्तरावरील कर्करोग आहे हे माहिती नाही. त्यांना पार्किसन्ससारखा आजार आहे. ‘न्यूजलाईन’ या मॅगझिनने सांगितले की, रशियन अब्जाधीश व पाश्चीमात्य उद्योगपतीची चर्चा रेकॉर्ड केली आहे. त्यात रशियन उद्योगपती म्हणतो की, पुतीन गंभीर आजारी आहेत. आपल्या जिद्दीमुळे त्यांनी रशिया, युक्रेन व अन्य देशांची अर्थव्यवस्था अडचणीत आणली आहे. या लढाईत १५ हजार रशियन सैनिक मारले गेले आहेत. पुतीन हे युद्ध जिंकू शकणार नाहीत. समजा, ही लढाई जिंकल्यास सत्तांतर निश्चीत आहे.
या टेपमध्ये बोलणाऱ्या उद्योगपतीच्या आवाजाची ओळख पटवली आहे. मात्र त्याचे नाव जाहीर केले नाही. यापूर्वी युक्रेनच्या लष्करी गुप्तचर यंत्रणेने पुतीन यांच्या आजारपणाबाबत माहिती दिली होती. त्यांनीही पुतीन यांना कर्करोग असल्याचे जाहीर केले होते.