Photo : X
आंतरराष्ट्रीय

असा अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पाहिला नाही; भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांची खोचक प्रतिक्रिया

अमेरिकेच्या विद्यमान अध्यक्षाप्रमाणे परराष्ट्र धोरण सार्वजनिकपणे चालवणारा अध्यक्ष अमेरिकेत झाला नाही, अशी खोचक प्रतिक्रिया भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी दिली.

Swapnil S

नवी दिल्ली : अमेरिकेच्या विद्यमान अध्यक्षाप्रमाणे परराष्ट्र धोरण सार्वजनिकपणे चालवणारा अध्यक्ष अमेरिकेत झाला नाही, अशी खोचक प्रतिक्रिया भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी दिली.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यकाळात अमेरिका आणि भारताच्या संबंधांमध्ये कटुता आली आहे. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी ट्रम्प यांच्यावर पलटवार करत त्यांच्या परराष्ट्र धोरणाला अभूतपूर्व म्हटले.

जयशंकर म्हणाले की, ट्रम्प यांचा जगभरातील देशांशी व्यवहार करण्याचा मार्ग आणि अगदी स्वतःच्या देशाशीही करार पारंपरिक करण्याची पद्धत पद्धतीपेक्षा खूप वेगळी आहे.

अमेरिकेसोबतच्या व्यापार चर्चेत भारताच्या काही मर्यादा आहेत. भारत हा शेतकरी व लघु उद्योजकांच्या हितांच्या रक्षणात कोणतीही तडजोड करणार नाही.

दोन्ही बाजूंमध्ये व्यापार कराराबाबत चर्चा सुरू आहे, असे ते म्हणाले. व्यापार हे प्रत्यक्षात दोन्ही देशांमधील सर्वात मोठे प्रकरण आहे. चर्चा अद्याप सुरू आहे. यातील महत्त्वाची बाब म्हणजे, आपल्या समोर काही मर्यादा आहेत, असे त्यांनी सांगितले.

ट्रम्प यांनी भारतीय वस्तूंवरील आयात शुल्क दुप्पट करून ५० टक्क्यांवर नेले, ज्यात भारताने रशियन कच्च्या तेलाच्या खरेदीवर घातलेले अतिरिक्त २५ टक्के कर समाविष्ट आहे. त्यानंतर भारत व अमेरिकेतील संबंधांत बिघाड झाला.

भारताकडून अमेरिकेकडे टपाल सेवा तात्पुरती बंद

नवी दिल्ली : अमेरिकेने भारतावर लादलेल्या 'टॅरिफ'ला प्रत्युत्तर म्हणून भारताने अमेरिकेकडे जाणारी टपाल सेवा तात्पुरती बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी २५ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. अमेरिकन सीमाशुल्क प्रशासनाच्या नवीन आदेशानंतर भारताने हे पाऊल उचलले आहे. या आदेशान्वये अमेरिकेने आंतरराष्ट्रीय टपाल पॅकेजबाबत कठोर नियम लागू केले. दोन्ही देशातील मुद्दे जोपर्यंत सुटत नाहीत, तोवर ही सेवा तात्पुरती बंद राहणार आहे, असे भारतीय टपाल विभागाने स्पष्ट केले.

गणपतीवर पर्जन्यवृष्टी; राज्यात सोमवारपासून पावसाचा जोर वाढणार

चाकरमानी चल्ले गावाक! रेल्वे, एसटी, आराम बस, खासगी गाड्या निघाल्या

मराठा आरक्षण : मनोज जरांगे-पाटील यांना सरकारचे चर्चेचे आवाहन

SRA बिल्डरांसाठी काम करते! मुंबई उच्च न्यायालयाने प्राधिकरणाला फटकारले

महाराष्ट्र, केरळच्या सरकारी कर्मचाऱ्यांना आगाऊ वेतन मिळणार