आंतरराष्ट्रीय

सौदी अरेबियात आता मद्य मिळणार; ७३ वर्षांनंतर उठवली बंदी

सौदी अरेबियाने ७३ वर्षांनंतर मद्यावरील बंदी उठवली आहे. त्यामुळे सौदीत आता मद्य मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पर्यटनाला चालना देण्यासाठी हा निर्णय सौदी सरकारने घेतला आहे.

Swapnil S

रियाध : सौदी अरेबियाने ७३ वर्षांनंतर मद्यावरील बंदी उठवली आहे. त्यामुळे सौदीत आता मद्य मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पर्यटनाला चालना देण्यासाठी हा निर्णय सौदी सरकारने घेतला आहे.

सौदी अरेबिया हा कट्टर मुस्लिम देश आहे. तेथे मद्य विक्रीस बंदी होती, पण सौदीत येत्या २०३४ मध्ये फिफा वर्ल्ड कप’ व ‘एक्स्पो २०३०’ हे आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. त्यामुळेच मद्य विक्रीवरील बंदी हटवण्याचा निर्णय सौदीने घेतला. ही मद्य विक्री सौदीतील काही भागात केली जाणार आहे. यासाठी ६०० ठिकाणी दुकाने उघडली जातील.

सौदी अधिकाऱ्यांनी सांगितले की, पर्यटनस्थळी मद्य विक्रीस परवानगी दिल्याने यूएई व बहरिन या देशांसोबत स्पर्धा करता येऊ शकेल. या दोन्ही देशांतील पर्यटनस्थळावर मद्य मिळते.

सौदीत वाइन, बिअर व कमी अल्कोहोल असलेले मद्य काही ठरावीक ठिकाणी व परवाना असलेल्या भागात मिळेल. यात मोठी हॉटेल्स, लक्झरी रिसॉर्ट, परदेशी नागरिकांसाठी बनलेल्या काही ठिकाणी ते मिळेल. मात्र, ज्या मद्यामध्ये २० टक्क्यांपेक्षा जास्त अल्कोहोल असते, त्याच्या विक्रीस परवानगी नसेल, असे हा अधिकारी म्हणाला.

कोकणवासीयांना यंदाही ‘बाप्पा’ पावणार; कोकणात जाणाऱ्यांना टोल माफी

श्रावणात पावसाची १५ दिवस सुट्टी; १५ ऑगस्टनंतरच पावसाची बॅटिंग, भारतीय हवामान विभागाची माहिती

मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर थेट नियंत्रणाचा मार्ग मोकळा

ऑपरेशन सिंदूरबाबत आक्षेपार्ह मजकूर नडला; FIR रद्द करण्यास हायकोर्टाचा नकार

IND vs ENG : "तू आम्हाला शिकवू नकोस"; खेळपट्टी पाहण्यास अटकाव करणाऱ्या ओव्हलच्या पिच क्युरेटरवर संतापला गौतम गंभीर | Video