ठाणेकरांनो लक्ष द्या! कल्याण-शिळ रोडवर ३१ मार्चपर्यंत वाहतूक बंद; पर्यायी मार्ग कोणते?

मानपाडा सर्कल ते टाटा नाकादरम्यान मेट्रोचे गर्डर बसवण्यासाठी जड गॅन्ट्री यंत्रांचा वापर केला जाणार आहे. या कामादरम्यान नागरिकांची आणि कामगारांची सुरक्षा लक्षात घेऊन...
ठाणेकरांनो लक्ष द्या! कल्याण-शिळ रोडवर ३१ मार्चपर्यंत वाहतूक बंद; पर्यायी मार्ग कोणते?
Published on

कल्याण-तळोजा मेट्रो लाईन-१२ प्रकल्पाच्या कामासाठी कल्याण-शिळ मार्गावर काही ठिकाणी रात्रीच्या वेळी वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय ठाणे शहर वाहतूक पोलिसांनी घेतला आहे. मेट्रो प्रकल्पासाठी मोठे सिमेंट गर्डर बसवण्याचे काम सुरू असल्यामुळे ही बंदी ६ मार्च ते ३१ मार्च २०२६ दरम्यान दररोज रात्री ११.५५ ते पहाटे ५ या वेळेत लागू राहणार आहे.

ठाणे वाहतूक विभागाच्या माहितीनुसार, मानपाडा सर्कल ते टाटा नाकादरम्यान मेट्रोचे गर्डर बसवण्यासाठी जड गॅन्ट्री यंत्रांचा वापर केला जाणार आहे. या कामादरम्यान नागरिकांची आणि कामगारांची सुरक्षा लक्षात घेऊन काही ठिकाणी वाहतूक बंद करून वाहनांना पर्यायी मार्गाने वळवण्यात येणार आहे.

टप्प्याटप्प्याने वाहतुकीत बदल

  • ६ ते १० मार्च : या कालावधीत सोनारपाडा (पिलर क्रमांक १८०) येथे वाहतूक बंद राहील. येथून वाहनांना डावीकडे वळवून सर्व्हिस रोडमार्गे डीएनएस चौक मार्गे पुढे सोडण्यात येईल.

ठाणेकरांनो लक्ष द्या! कल्याण-शिळ रोडवर ३१ मार्चपर्यंत वाहतूक बंद; पर्यायी मार्ग कोणते?
ठाण्यात RTO ॲक्शन मोडवर! २१ स्कूल बस व ४ अवैध बसेसवर कारवाई
  • ११ ते १८ मार्च : या टप्प्यात विकोनाका (पिलर क्रमांक १०५) येथे प्रवेश बंद असेल. वाहनांना विकोनाका येथून डावीकडे वळवून सर्व्हिस रोडमार्गे पिलर क्रमांक ६७ टाटा नाका मार्गे पुढे जाता येईल.

  • १९ ते २५ मार्च : या काळात मानपाडा चौक (पिलर क्रमांक २००) येथे वाहतूक बंद राहील. वाहनांना डावीकडे वळवून सर्व्हिस रोडमार्गे सोनारपाडा (पिलर क्रमांक १८०) मार्गे पुढे जाता येईल.

ठाणेकरांनो लक्ष द्या! कल्याण-शिळ रोडवर ३१ मार्चपर्यंत वाहतूक बंद; पर्यायी मार्ग कोणते?
मुंबईकरांनो लक्ष द्या! उद्या तिन्ही रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक; वाचा संपूर्ण वेळापत्रक
  • २६ ते ३१ मार्च : अंतिम टप्प्यात सोनारपाडा (पिलर क्रमांक १६४) येथे वाहतूक बंद ठेवली जाईल. वाहनांना सर्व्हिस रोडमार्गे वळवून डीएनएस चौकाजवळ पुन्हा मुख्य रस्त्यावर सोडण्यात येईल.

दरम्यान, ठाणे वाहतूक पोलिसांनी रात्री उशिरा प्रवास करणाऱ्या वाहनचालकांनी या नियमांचे पालन करावे तसेच शक्य असल्यास पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन केले आहे.

logo
marathi.freepressjournal.in