सोमालियाच्या किनारपट्टीलगत तेलवाहू जहाजाचे अपहरण; समुद्री चाच्यांचा संशय 'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
आंतरराष्ट्रीय

सोमालियाच्या किनारपट्टीलगत तेलवाहू जहाजाचे अपहरण; समुद्री चाच्यांचा संशय

सोमालियाच्या ईशान्य किनारपट्टीवर संशयित समुद्री चाच्यांनी एका इंधन टँकरचे (तेलवाहू जहाज) अपहरण केले आहे. स्थानिक अधिकारी आणि ब्रिटीश सैन्याने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. सोमालियाची राजधानी मोगादिशूकडे हे जहाज जात असताना ही घटना घडली.

Swapnil S

मोगादिशू (सोमालिया) : सोमालियाच्या ईशान्य किनारपट्टीवर संशयित समुद्री चाच्यांनी एका इंधन टँकरचे (तेलवाहू जहाज) अपहरण केले आहे. स्थानिक अधिकारी आणि ब्रिटीश सैन्याने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. सोमालियाची राजधानी मोगादिशूकडे हे जहाज जात असताना ही घटना घडली.

नेमकी घटना काय ?

माहितीनुसार, मिळालेल्या पुंटलैंड या निम-स्वायत्त राज्यातील हाफून आणि बंदरबेला या किनारपट्टीच्या शहरांमधील समुद्रात बुधवारी हे जहाज ताब्यात घेण्यात आले. हे जहाज बार्बेरा बंदरातून निघाले होते आणि मोगादिशूच्या दिशेने प्रवास करत होते.

पुंटलैंड सागरी पोलीस दलाच्या एका कर्नलने नाव न सांगण्याच्या अटीवर 'द असोसिएटेड प्रेस'ला माहिती दिली की, बंदरबेला जिल्ह्यातील सहा सशस्त्र व्यक्तींनी या जहाजाचे अपहरण केले आहे.

महत्त्वाचे तपशील :

  • जहाजाची मालकी हे जहाज पाकिस्तानी मालकीचे असून स्थानिक व्यापाऱ्यांनी ते भाड्याने घेतले होते.

  • साठा जहाजामध्ये मोठ्या प्रमाणात इंधनाचा साठा आहे.

  • कर्मचारी जहाजावर नेमके किती कर्मचारी आहेत, याची माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही.

आंतरराष्ट्रीय यंत्रणा सतर्क

ब्रिटीश सैन्याच्या 'युनायटेड किंगडम मेरीटाइम ट्रेड ऑपरेशन्स' (UKMTO) ने देखील या घटनेबाबत निवेदन प्रसिद्ध केले आहे. अनधिकृत व्यक्तींनी जहाजाचा ताबा घेतला असून ते जहाज सोमालियाच्या प्रादेशिक समुद्रात दक्षिणेच्या दिशेने नेले जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

सुटकेसाठी प्रयत्न सुरू

जहाज आणि त्यावरील कर्मचाऱ्यांची सुटका करण्यासाठी पुंटलैंड सुरक्षा दलावर स्थानिक नेत्यांकडून दबाव वाढत आहे. दरम्यान, चाच्यांकडून अद्याप कोणत्याही खंडणीची मागणी करण्यात आलेली नाही.

गेल्या दशकात आंतरराष्ट्रीय नौदल गस्त आणि वाढीव सुरक्षेमुळे सोमालियातील समुद्री चाचेगिरीच्या घटनांमध्ये मोठी घट झाली होती. मात्र, या ताज्या घटनेमुळे पुन्हा एकदा समुद्री सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

कोकण हापूसची आवक वाढली; दरात घसरण झाल्याने ग्राहकांना दिलासा

जप्त केलेल्या नोटा उंदरांनी कशा कुरतडल्या? सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केले आश्चर्य

के. कविता यांचा नवा राजकीय पक्ष; 'तेलंगणा राष्ट्र समिती' नावाने वडिलांनाच दिले आव्हान

सिंधुदुर्गातील 'MH-०७' क्रमांकाच्या वाहनांना टोल नाही; पालकमंत्री नितेश राणे यांचा जिल्हावासीयांना दिलासा

ठाण्याची झणझणीत मामलेदारची मिसळ इतिहासजमा; तहसील कार्यालय परिसराच्या पुनर्विकासाच्या पार्श्वभूमीवर इमारत जमीनदोस्त