आंतरराष्ट्रीय

पाकिस्तानातील काही असंतुष्टांचे देशातील दहशतवादी संघटनांशी संबंध ;पाकिस्तानने केले मान्य

नवशक्ती Web Desk

इस्लामाबाद : युनायटेड किंगडम आणि इतर देशांमध्ये आश्रय मागणाऱ्या काही राजकीय असंतुष्टांचे देशातील दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याचे पाकिस्ताननेच आता मान्य केले आहे.

परराष्ट्र कार्यालयाच्या प्रवक्त्या मुमताज जेहरा बलोच यांनी गुरुवारी येथे साप्ताहिक वार्तालापादरम्यान तुरुंगात असलेले पंतप्रधान इम्रान खान यांच्या सहाय्यकावर झालेल्या कथित अॅसिड हल्ल्याच्या प्रश्नाला उत्तर देताना हे विधान केले.

पाकिस्तान तहरिक-ए-इन्साफचे नेते आणि पंतप्रधानांचे माजी विशेष सहाय्यक, मिर्झा शहजाद अकबर यांनी गेल्या आठवड्यात दावा केला होता की, ब्रिटनमधील त्यांच्या घरी त्याच्यावर हल्ला करण्यात आला होता आणि त्याच्यावर "आम्लयुक्त द्रव" फेकण्यात आले होते.

या घटनेबद्दल विचारले असता, परराष्ट्र कार्यालयाच्या या प्रवक्त्याने या हल्ल्यात पाकिस्तानचा आणि पाकिस्तानी एजन्सींचा सहभाग असल्याच्या आरोपांचा इन्कार केला. परदेशात आमच्याच नागरिकांना लक्ष्य करण्याचे आमचे धोरण नाही. तथापि, अनेक राजकीय असंतुष्टांनी राजकीय आश्रय घेतला आहे आणि ते अनेक दशकांपासून ब्रिटन आणि जगभरातील इतर देशांमध्ये राहत आहेत. त्यांच्यापैकी अनेकांचा पाकिस्तानमधील दहशतवादी संघटनांशी संबंध आहे, असे त्यांनी सांगितले.

मुंबईत आज पाऊस बरसणार; १६ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधारचा IMD चा इशारा

विधानसभेचे रणशिंग फुंकणार; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भिडणार!

IND vs BAN 3rd T20I : टीम इंडिया आज क्लीन स्वीपचे 'तोरण' बांधणार; 'या' ४ खेळाडूंना संधी मिळणार?

रतन टाटांचा वारसदार मिळाला; नोएल टाटा बनले टाटा ट्रस्टचे चेअरमन

इस्रायलचा लेबनॉनमधील संयुक्त राष्ट्रांच्या इमारतीवर हल्ला; भारताकडून चिंता व्यक्त