आंतरराष्ट्रीय

व्हेरिफिकेशनशिवाय कोणत्याही भारतीयाला मिळणार ‘ब्लू टीक’ पण...

भारतातील काही वापरकर्त्यांनी आज ट्विट केले की त्यांना ट्विटरचे सबस्क्रिप्शनसाठी सूचना मिळाली आहे. हे अपडेट सध्या फक्त आयफोन वर उपलब्ध आहेत

वृत्तसंस्था

ट्विटरचे मालकी हक्क मिळताच ‘ट्विटर ब्लू टिक' सेवेसाठी पैसे आकारण्याची घोषणा एलॉन मस्क यांनी केली होती. तसेच प्रत्येक देशाच्या खरेदी क्षमतेनुसार या फीमध्ये बदल होईल, असे त्यांनी जाहीर केले होते. बातमी नुसार ट्विटरने आपली 'ब्लू' सेवा लवकरच भारतात सुरू करणार आहेत. ज्या सेवेची किंमत यूएस मध्ये ७.९९ डॉलर आहे, ती भारतात अधिक महाग असण्याची शक्यता आहे आणि दरमहा ७१९ रुपये आकारण्यात येईल.

भारतातील काही वापरकर्त्यांनी आज ट्विट केले की त्यांना ट्विटरचे सबस्क्रिप्शनसाठी सूचना मिळाली आहे. हे अपडेट सध्या फक्त आयफोन वर उपलब्ध आहेत. येत्या काही दिवसांत ही सेवा सर्वांसाठी उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे.

जून 2009 मध्ये सादर करण्यात आलेली, 'ट्विटर ब्लु टिक' हि सुविधा ज्यांनी अकाउंट वेरीफाई असल्याचे समजते. जसे की खातेदारकाच आणि संस्थांमध्ये फरक करण्यासाठी एक माध्यम प्रदान करते. आता माहितीनुसार ट्विटर युसरना कोणत्याही पडताळणी शिवाय ‘व्हेरिफाईड बॅज’ मिळणार. याशिवाय सुविधे अंतर्गत सबस्क्रिप्शन असणाऱ्या युसरना अनेक सुविधा मिळणार आहेत.

इंटरनेट स्पॅमपासून वाचण्यात मदत होईल. हे सबस्क्रिप्शन घेतल्यास अर्ध्या जाहिराती कमी होतील. युसर मोठे ऑडिओ आणि विडिओ देखील पोस्ट करू शकतो. तसेच या सेवेअंतर्गत काही युसर मध्ये मतभेद आहे, कि ट्विटर पैसे आकारून हा बॅच देत असल्याने या सेवेचा गैरवापर हि होऊ शकतो.

मविआचा महानिक्काल, महायुतीच लाडकी; महायुतीला २३६ जागा, तर मविआला केवळ ४९ जागा

‘लाडकी बहीण’ योजना ठरली गेमचेंजर; देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार

सावत्र भावांना बहिणींनी जोडा दाखवला - मुख्यमंत्री

झारखंडमध्ये ‘जेएमएम’च्या नेतृत्वाखालील सरकार; इंडिया आघाडीकडे बहुमत, भाजप दुसऱ्या क्रमांकावर

तुष्टीकरणाला उत्तर कसे द्यायचे हे महाराष्ट्राने दाखवले - मोदी