आंतरराष्ट्रीय

मस्क यांच्या ‘स्पेसएक्स’ला धक्का; स्टारशिप चाचणीदरम्यान प्रचंड मोठा स्फोट

अमेरिकन उद्योगपती एलॉन मस्क यांच्या ‘स्पेसएक्स’ कंपनीला मोठा धक्का बसला असून, बुधवारी टेक्सासमधील मॅसी येथील स्टारबेस चाचणी स्थळी स्पेसएक्सच्या स्टारशिप रॉकेटचा स्फोट झाला. ‘स्टारशिप ३६’ नावाच्या या सुपर रॉकेटच्या स्थिर अग्निचाचणीदरम्यान हा स्फोट झाला. ही घटना रात्री ११ वाजण्याच्या सुमारास घडली. त्यावेळी रॉकेटचे इंजिन जमिनीवर चाचणीसाठी सुरू करण्यात आले होते.

Swapnil S

ऑस्टिन : अमेरिकन उद्योगपती एलॉन मस्क यांच्या ‘स्पेसएक्स’ कंपनीला मोठा धक्का बसला असून, बुधवारी टेक्सासमधील मॅसी येथील स्टारबेस चाचणी स्थळी स्पेसएक्सच्या स्टारशिप रॉकेटचा स्फोट झाला. ‘स्टारशिप ३६’ नावाच्या या सुपर रॉकेटच्या स्थिर अग्निचाचणीदरम्यान हा स्फोट झाला. ही घटना रात्री ११ वाजण्याच्या सुमारास घडली. त्यावेळी रॉकेटचे इंजिन जमिनीवर चाचणीसाठी सुरू करण्यात आले होते.

या स्फोटामुळे ‘स्टारशिप प्रोटोटाइप’चे मोठे नुकसान झाले असून, ‘स्पेसएक्स’ला सर्व प्रक्षेपण तयारी अनिश्चित काळासाठी स्थगित करावी लागली आहे. दरम्यान, या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, चाचणी सुरू झाल्यानंतर काही सेकंदांतच रॉकेटचा समोरील भाग अचानक फुटला. ज्यामुळे शक्तिशाली स्फोट झाला. त्यानंतर संपूर्ण परिसरात धुराचे लोट पसरले होते.

कोकणवासीयांना यंदाही ‘बाप्पा’ पावणार; कोकणात जाणाऱ्यांना टोल माफी

श्रावणात पावसाची १५ दिवस सुट्टी; १५ ऑगस्टनंतरच पावसाची बॅटिंग, भारतीय हवामान विभागाची माहिती

मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर थेट नियंत्रणाचा मार्ग मोकळा

ऑपरेशन सिंदूरबाबत आक्षेपार्ह मजकूर नडला; FIR रद्द करण्यास हायकोर्टाचा नकार

IND vs ENG : "तू आम्हाला शिकवू नकोस"; खेळपट्टी पाहण्यास अटकाव करणाऱ्या ओव्हलच्या पिच क्युरेटरवर संतापला गौतम गंभीर | Video