Video : स्पेनमध्ये हाय-स्पीड ट्रेन धडकल्या; ६४ ठार (Photo-X)
आंतरराष्ट्रीय

Video : स्पेनमध्ये हाय-स्पीड ट्रेन धडकल्या; ६४ ठार

स्पेनमध्ये बुधवारी सकाळी एका हाय-स्पीड ट्रेनने दुसऱ्या थांबलेल्या ट्रेनला मागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात किमान ६४ जण जागीच ठार झाले असून, ८० हून अधिक जण जखमी झाले आहेत.

Swapnil S

माद्रिद : स्पेनमध्ये बुधवारी सकाळी एका हाय-स्पीड ट्रेनने दुसऱ्या थांबलेल्या ट्रेनला मागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात किमान ६४ जण जागीच ठार झाले असून, ८० हून अधिक जण जखमी झाले आहेत. प्रशासनाने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली आहे. चालू वर्षातील स्पेनमधील हा दुसरा मोठा रेल्वे अपघात आहे.

स्पेनच्या रेल्वे यंत्रणा ऑपरेटर 'ॲडिफ'ने दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात तोलेदो प्रांतात घडला. माद्रिद येथून सेव्हिलच्या दिशेने जाणाऱ्या दोन हाय-स्पीड गाड्या एकाच दिशेने जात होत्या.

या गाड्यांमध्ये शेकडो प्रवासी होते. त्यापैकी एका ट्रेनने पुढे थांबलेल्या ट्रेनला मागून धडक दिली, ज्यामुळे दोन्ही गाड्यांचे दोन डबे रुळावरून खाली घसरले.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

दिवाळीपूर्वी मुंबई धूळ मुक्त; पालिकेची विशेष मोहीम, ९ दिवसांत प्रमुख रस्त्यांची स्वच्छता

Pune : पिंपरी-चिंचवडमध्ये मध्यरात्री इमारतीच्या पार्किंगला भीषण आग; अनेक वाहनांचे नुकसान, एक जखमी, Video

Mumbai : २८ बांधकामांवर कारवाई; बोरिवली-विरार विस्तार मार्गाचा मार्ग मोकळा

Mumbai : ७ आरएमसी कारखान्यांना पालिकेची नोटीस; सात दिवसांत त्रुटी दूर करण्याचे निर्देश

Mumbai : धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलचा जागतिक डंका; आयबी शाळांच्या जागतिक क्रमवारीत नववे स्थान