'श्रीलंका' ठरले भारतीय लग्नांचे नवे हॉटस्पॉट; पश्चिम आशियातील संकटाचा परिणाम; लोकप्रियतेत २५ टक्क्यांची वाढ प्रातिनिधिक छायाचित्र
आंतरराष्ट्रीय

'श्रीलंका' ठरले भारतीय लग्नांचे नवे हॉटस्पॉट; पश्चिम आशियातील संकटाचा परिणाम; लोकप्रियतेत २५ टक्क्यांची वाढ

२०२५ मध्ये परदेशात होणाऱ्या भारतीय लग्नांसाठी 'श्रीलंका' हे सर्वात वेगाने वाढणारे ठिकाण म्हणून समोर आले असून त्याच्या लोकप्रियतेत २५ टक्क्यांची वाढ झाली आहे. एका अहवालानुसार, सध्या सुरू असलेल्या पश्चिम आशियातील संकटामुळे निर्माण झालेल्या आव्हानांनंतरही जोडपे या वर्षातील त्यांच्या या खास सोहळ्याच्या नियोजनात कोणतीही कपात करण्याची शक्यता नाही.

Swapnil S

नवी दिल्ली : २०२५ मध्ये परदेशात होणाऱ्या भारतीय लग्नांसाठी 'श्रीलंका' हे सर्वात वेगाने वाढणारे ठिकाण म्हणून समोर आले असून त्याच्या लोकप्रियतेत २५ टक्क्यांची वाढ झाली आहे. एका अहवालानुसार, सध्या सुरू असलेल्या पश्चिम आशियातील संकटामुळे निर्माण झालेल्या आव्हानांनंतरही जोडपे या वर्षातील त्यांच्या या खास सोहळ्याच्या नियोजनात कोणतीही कपात करण्याची शक्यता नाही.

भारतापासूनचे कमी अंतर, सहज प्रवास क्षमता, आलिशान आदरातिथ्य पायाभूत सुविधा आणि अनुभवांवर आधारित सोहळे यांमुळे श्रीलंका हे डेस्टिनेशन वेडिंगचे एक वेगाने उदयास येणारं केंद्र बनले आहे, असे आघाडीचे वेडिंग प्लॅनिंग प्लॅटफॉर्म 'वेडमीगुड'ने 'डेस्टिनेशन वेडिंग रिपोर्ट २०२६'मध्ये म्हटले आहे.

अहवालानुसार, २०२५ मध्ये श्रीलंकेत शांग्री-ला (हंबनटोटा), शांग्री-ला (कोलंबो), अमाया हिल्स (कँडी), द ग्रँड हॉटेल (नुवारा एलिया), जेटविंग लगून (नेगोंबो) हॉटेल्सना भारतीय जोडप्यांनी सर्वाधिक पसंती दिली. थायलंड हे अजूनही सर्वाधिक पसंतीचे ठिकाण असून, २०२५ मध्ये तिथे २५ लाख भारतीयांचे आगमन झाले. आता डेस्टिनेशन वेडिंगचा कालावधी वाढून सरासरी ३.२ दिवस झाला आहे. याशिवाय, आंतरराष्ट्रीय स्थळांवरही आता भारतीय खाद्यपदार्थांना मोठी पसंती दिली जात आहे.

हा अहवाल वेडमीगुडच्या ग्राहक, व्यावसायिक नेटवर्कमधील सर्वेक्षणावर आधारित आहे.

यामध्ये २.५ लाख ग्राहक आणि २४,००० वेडिंग इंडस्ट्री प्रोफेशनल्स/व्हेंडर्सचा समावेश होता. अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर आंतरराष्ट्रीय प्रवासाला मोठा फटका बसला.

लोकप्रिय विवाह स्थळे

  • इतर आंतरराष्ट्रीय ठिकाणे : इंडोनेशियातील बाली, व्हिएतनाम आणि मलेशिया

  • युरोपमधील पसंतीचे देश : इटली, फ्रान्स, ग्रीस, स्पेन आणि पोर्तुगाल

  • भारतातील टॉप ५ ठिकाणे : डेहराडून, मसुरी, ऋषिकेश, शिमला आणि जिम कॉर्बेट; त्यापाठोपाठ उदयपूर, जयपूर, जैसलमेर, जोधपूर आणि गोवाही

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

'जव्हार' ठरला १०० टक्के तंबाखूमुक्त शाळांचा पहिला तालुका; सर्व २६८ शाळांना तंबाखूमुक्त प्रमाणपत्र; व्यसनमुक्त समाजाकडे ऐतिहासिक पाऊल

अर्नाळा किल्ला ग्रामपंचायतीचे उपसरपंच अजय वैती अपात्र; खोटी माहिती देऊन निवडणूक लढवल्याचा ठपका

संत ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्यासाठी फलटण सज्ज; वीज व पालखी तळावरील सुविधांची जय्यत तयारी

माजी खा. विनायक राऊत कुटुंबीयांविरोधात गुन्हा; सुनेकडून प्रतिबंधक कायद्यांतर्गत गंभीर आरोप

'स्पेशलाइज्ड इन्व्हेस्टमेंट फंड' गुंतवणुकीत भर; जूनमध्ये गुंतवणूक २९ टक्क्यांनी वाढून १७,८५८ कोटी रुपयांवर