AP
आंतरराष्ट्रीय

जपानला भूकंपाचा जोरदार धक्का; त्सुनामीचा इशारा

जपानच्या दक्षिण तटवर्ती क्षेत्राला गुरुवारी भूकंपाचा जोरदार धक्का बसला. त्यामुळे त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे.

Swapnil S

टोक्यो : जपानच्या दक्षिण तटवर्ती क्षेत्राला गुरुवारी भूकंपाचा जोरदार धक्का बसला. त्यामुळे त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. तटवर्ती क्षेत्रापासून दूर राहण्याची सूचना नागरिकांना देण्यात आली आहे. मात्र या भूकंपात जीवितहानी अथवा मालमत्तेची मोठ्या प्रमाणावर हानी झाल्याचे वृत्त आलेले नाही.

भूकंपाचा हा धक्का ७.१ तीव्रतेचा होता आणि त्याचा केंद्रबिंदू पूर्व किनाऱ्यावर समुद्रात होता. या भूकंपामुळे निचिआन शहर आणि जवळच्या परिसराला मुख्यत्वे जोरदार हादरे बसले, असे जपानच्या हवामान विभागाने म्हटले आहे. भूकंपाचा धक्का बसल्यानंतर ख्युशू बेटाच्या दक्षिणेकडील तटवर्ती क्षेत्रात ५० सें.मी. (१.६ फूट) उंचीच्या त्सुनामी लाटा जवळपास ३० मिनिटे दिसत होत्या.

या भूकंपामध्ये जीवितहानी अथवा मालमत्तेचे कितपत नुकसान झाले आहे त्याचा आढावा अधिकारी घेत आहेत. तटवर्ती क्षेत्रापासून नागरिकांनी दूर रहावे, असे आवाहन मुख्य कॅबिनेट सचिव योशिमासा हयाशी यांनी केले आहे.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी