आंतरराष्ट्रीय

जगावर मंदी येणार ; डेव्हीड मालपास

वृत्तसंस्था

रशिया-युक्रेन युद्धाला तीन महिने झाले असून ते थांबवण्याचे नाव घ्यायला तयार नाही. या युद्धामुळे जगभरात महागाई पसरली आहे. जगातील अर्थव्यवस्थेला मोठा धक्का बसत आहे. त्यामुळे जगावर मंदी येणार आहे, असा इशारा जागतिक बँकेचे प्रमुख डेव्हीड मालपास यांनी दिला आहे.

अमेरिकन व्यापार कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले की, रशियाच्या युक्रेनवरील हल्ल्यामुळे जगावर वैश्वीक मंदीचे संकट उभे ठाकले आहे. कारण अन्नधान्य, ऊर्जा व खत आदींच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. एक-दोन देशांना नव्हे तर जगातील सर्वच देश महागाईने हैराण झाले आहेत. जागतिक अर्थव्यवस्था आंकुचन पावण्याचा मोठा धोका आहे. सध्याचा जागतिक जीडीपी पाहता या मंदीतून कसे वाचावे हे सांगणे कठीण आहे. तेलाच्या दरांनी जगात महागाई वाढवली आहे. इंधनाच्या किंमती दुप्पट होणे म्हणजेच मंदीची पकड मजबूत होण्यास पर्याप्त आहे, असे ते म्हणाले.

गेल्याच महिन्यात जागतिक बँकेने आपला जागतिक आर्थिक विकास दर ३.२ टक्के केला होता.

इंधनाच्या किंमती वाढल्याने युरोपची अर्थव्यवस्था संकटात सापडली आहे. विकसीत देशही खत, अन्नधान्य व इंधनाच्या टंचाईमुळे अडचणीत सापडले आहेत. रशियन-युक्रेन युद्धाच्याशिवाय चीनने आपल्या अनेक शहरांमध्ये लॉकडाऊन लावला आहे. कोरोनाच्या नवीन लाटेमुळे चीनच्या विकासावर मोठा परिणाम होऊ शकतो.

२२ सप्टेंबरपासून नवे GST दर लागू; कोणत्या वस्तू स्वस्त, तर कोणत्या राहणार स्थिर? वाचा सविस्तर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! नवी झळाळी घेऊन येतेय 'मोनोरेल'; पाहा काय आहेत नवे बदल?

UPSC उमेदवार पडताळणीसाठी AI ची मदत घेणार

Mumbai-Ahmedabad Bullet Train Project : बुलेट ट्रेन प्रकल्पाला वेग; घणसोली-शीळफाटा दरम्यान पाच किमीचा बोगदा पूर्ण

Kalyan-Dombivli : रहिवाशांची फसवणूक करणाऱ्यांवर कारवाई - शिंदे