डोनाल्ड ट्रम्प संग्रहित छायाचित्र
आंतरराष्ट्रीय

Trump trade war: डोनाल्ड ट्रम्प यांची दुसऱ्यांदा माघार

अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी या आठवड्यात दुसऱ्यांदा माघार घेतली आहे.

Swapnil S

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी या आठवड्यात दुसऱ्यांदा माघार घेतली आहे. स्मार्टफोन, संगणक, चिप्स आदी वस्तूंना 'जशास तसे' (रेसिप्रोकल कर) करातून वगळण्याची घोषणा शनिवारी केली. चीनसह जगभरातून आयात होणाऱ्या या वस्तूंना ही कर सवलत मिळेल.

ट्रम्प यांनी दोन दिवसांपूर्वी चीनवरील टॅरिफ १४५ टक्के केला होता. यामुळे अॅपलसारखी तंत्रज्ञान कंपनी अडचणीत सापडली असती. ही कंपनी आपले बहुतांशी उत्पादने चीनमध्ये बनवते.

या नवीन कर सवलतीत लॅपटॉप, सेमीकंडक्टर, सोलर सेल, फ्लॅट पॅनल टीवी डिस्प्ले, फ्लॅश ड्राइव्ह, मेमरी कार्ड आणि डेटा साठवणुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या सॉलिड स्टेट ड्राईव्हसह अन्य इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांना सवलत दिली आहे. तर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे हे चीनमधून येणाऱ्या सामानावर लावलेला १४५ टक्के टॅरिफ कमी करू शकतात, अशी शक्यता आहे. अमेरिकेने १० एप्रिल रोजी चीनवर टॅरिफ वाढवून १४५ टक्के केला होता. तर चीनने अमेरिकन वस्तूंवर १२५ टक्के टॅरिफ लावला. तर अमेरिकेने भारतासहित ७५ हून अधिक देशांवर एकसारखाच १० टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा केली.

Mumbai : चार हॉटेल्सवर एफडीएची कारवाई; कॅफे मोंडेगर, महाराष्ट्र बिर्याणी सेंटरचे परवाने निलंबित

Mumbai Ganeshotsav 2026 : बाप्पासाठी चक्क रेल्वे; मूषक झाले प्रवासी, सोशल मीडियावर Video व्हायरल

PMLA प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; ED कडून प्रकरणांचा तपशील मागवला

Ganeshotsav 2026 : गणपती दर्शनाला ठाण्यात जाताय? 'या' मंडळांना नक्की भेट द्या

ठाण्यात आस्थापनांची परवाना नूतनीकरणाकडे पाठ; परवाना विभागाकडून मागील १८ महिन्यांत १,१८२ नोटिसा, अवघ्या ४३४ चे नूतनीकरण