Iran vs US-Israel War : डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा; "४८ तासांत होर्मुझ सामुद्रधुनी खुली करा, नाहीतर.... 
आंतरराष्ट्रीय

Iran vs US-Israel War : डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा; "४८ तासांत होर्मुझ सामुद्रधुनी खुली करा, नाहीतर....

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला ४८ तासांत होर्मुझ सामुद्रधुनी खुली करण्याचा इशारा दिला आहे. अन्यथा वीज प्रकल्पांवर हल्ल्याची धमकी दिल्याने मध्यपूर्वेतील तणाव वाढला आहे.

किशोरी घायवट-उबाळे

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रविवारी (दि.२२) इराणला कडक इशारा दिला आहे. जर इराणने होर्मुझ सामुद्रधुनी (Strait of Hormuz) पूर्णपणे खुली केली नाही, तर अमेरिकेकडून त्यांच्या वीज प्रकल्पांवर हल्ला केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

४८ तासांची अंतिम मुदत

ट्रम्प यांनी इराणला यासाठी ४८ तासांची मुदत दिली आहे. त्यांनी सोशल मीडियावर लिहिले की, "इराणने कोणताही धोका न देता होर्मुझ सामुद्रधुनी खुली केली नाही, तर अमेरिका त्यांच्या प्रमुख वीज प्रकल्पांना लक्ष्य करेल."

अमेरिकेची स्पष्ट भूमिका

अमेरिकेच्या सेंट्रल कमांडनेही आपली भूमिका स्पष्ट केली आहे. इराणकडून अमेरिकन नागरिक आणि शेजारी देशांना होणारा धोका कमी करणे हेच आमचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.

इराणचा पलटवाराचा इशारा

दरम्यान, इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्ड्स (IRGC) एरोस्पेस फोर्सचे प्रमुख मेजर जनरल सय्यद मजीद मूसावी यांनी मोठा दावा केला आहे. त्यांनी सांगितले की, "इराण आता आकाशावर वर्चस्व गाजवत आहे आणि पुढील हल्ले अमेरिकेला व इस्रायलला चकित करतील."

इराणी संसदाध्यक्षांचा इशारा

इराणचे संसदाध्यक्ष एम.बी. घालिबाफ (M.B. Ghalibaf) यांनीही इस्रायलला इशारा दिला आहे. इस्रायलची संरक्षण यंत्रणा कमजोर पडत असल्याचे त्यांनी म्हटले असून, आता संघर्ष नव्या टप्प्यात जाण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.

इस्रायलच्या संरक्षण व्यवस्थेवर प्रश्न

दरम्यान, इस्रायलमध्ये एका क्षेपणास्त्राने थेट हल्ला केल्यानंतर त्यांच्या संरक्षण व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत. दक्षिणेकडील अराड (Arad) शहरात हा हल्ला झाला असून, दोन वेळा क्षेपणास्त्र रोखण्यात अपयश आल्याचे सांगितले जात आहे.

Mumbai : कांजूरमार्ग डंपिंग ग्राऊंडमधून दुर्गंधी येणे सुरूच; समितीची नियुक्ती करणार, हायकोर्टाचे संकेत

India Defence : लेफ्टनंट जनरल एन. एस. राजा सुब्रमणी देशाचे नवे CDS; व्हाइस ॲडमिरल कृष्णा स्वामीनाथन यांच्याकडे नौदलाची धुरा

ज्यूसमध्ये गुंगीचं औषध मिसळून ऑटोचालकाचा महिलेवर लैंगिक अत्याचार; VIDEO काढून करत होता ब्लॅकमेल

Mumbai : देवनार पशुवधगृहात बकरी ईद सणासाठी पालिकेच्या सोयीसुविधा; म्हैस, बकऱ्यांच्या बाजाराचे आयोजन

‘पॉश’चे उल्लंघन केल्यास ५० हजारांचा दंड