ओमानच्या समुद्रात भारताचे मालवाहू जहाज बुडाले (Photo- FPJ)
आंतरराष्ट्रीय

ओमानच्या समुद्रात भारताचे मालवाहू जहाज बुडाले

पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताकडे येणारी एलपीजी वाहून नेणारी दोन जहाजे होर्मुझ सामुद्रधुनीतून सुखरूप बाहेर पडली आहेत.

Swapnil S

नवी दिल्ली : पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताकडे येणारी एलपीजी वाहून नेणारी दोन जहाजे होर्मुझ सामुद्रधुनीतून सुखरूप बाहेर पडली आहेत. दुसरीकडे, या धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाच्या जलमार्गाजवळ एका भारतीय मालवाहू जहाजावर हल्ला झाल्यामुळे ते बुडाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी गुरुवारी दिली.

'सायमी' या एलपीजी टँकरने १३ मे रोजी ही सामुद्रधुनी ओलांडली, तर 'एनव्ही सनशाईन' हे जहाज गुरुवारी सुखरूप बाहेर पडले. दुसऱ्या एका घटनेत सोमालियाहून शारजाहकडे जात असलेल्या 'हाजी अली' या भारतीय लाकडी मालवाहू जहाजावर ओमानच्या सागरी हद्दीत बुधवारी पहाटे हल्ला झाला. या हल्ल्यामुळे जहाजाला आग लागली आणि ते समुद्रात बुडाले, अशी माहिती बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयातर्फे देण्यात आली. जहाजावरील सर्व १४ खलाशांना ओमानच्या तटरक्षक दलाने वाचवले असून, त्यांना ओमानमधील दिब्बा बंदरात नेण्यात आले आहे.

Mumbai Ganeshotsav 2026 : गिरगावात १३३ वर्षांची परंपरा; नारळापासून साकारली १० फुटांची मूर्ती, Video

Mumbai : अंधेरीत साकारणार मीनाक्षी मंदिर; क्रांती गणेशोत्सव मंडळाचे सुवर्ण महोत्सवी वर्ष

Mumbai : गणेशोत्सवासाठी महापालिका सज्ज; ३८३ कृत्रिम तलाव; १,१३२ जीवरक्षक तैनात

Mumbai : धोकादायक पुलांवर खबरदारी! गणेशोत्सवात सावधगिरीचे आवाहन; रेल्वे मार्गावरील पुलांचा समावेश

Mumbai : चेंबूरमध्ये चालत्या बेस्ट बसला आग; चालकाच्या प्रसंगावधानाने अनर्थ टळला, ४० प्रवासी बचावले