युक्रेन सैन्याचे संग्रहित फोटो  
आंतरराष्ट्रीय

युक्रेनचा आक्रमक पवित्रा; रशियातील काही गावे ताब्यात घेतली

युक्रेनचे सैन्य रशियाच्या हद्दीत १० किमीपर्यंत पोहोचल्याचे वृत्त आहे. या हल्ल्यामुळे ७६ हजार लोकांनी आपली घरेदारे सोडल्याचे सांगण्यात येते.

Swapnil S

कीव्ह : रशिया आणि युक्रेनमधील अडीच वर्षांच्या प्रदीर्घ युद्धादरम्यान युक्रेनने आता आक्रमक पवित्रा घेत रशियात घुसून काही गावे ताब्यता घेतली आहेत. युक्रेनचे सैन्य रशियाच्या हद्दीत १० किमीपर्यंत पोहोचल्याचे वृत्त आहे. या हल्ल्यामुळे ७६ हजार लोकांनी आपली घरेदारे सोडल्याचे सांगण्यात येते.

रशियामध्ये एक हजाराहून अधिक युक्रेनियन सैनिक २० चिलखती वाहने आणि ११ टँकच्या सहाय्याने घुसले असून, त्यांनी अनेक गावे काबीज केली आहेत. त्यांचे पुढील लक्ष्य सुडजा शहर असल्याचे सांगण्यात येते. रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यापासून युक्रेनने केलेला सर्वात मोठा प्रतिहल्ला आहे.

रशियाच्या ओक्त्याब्रस्को शहरात १५ लष्करी वाहनांच्या ताफ्याचे युक्रेनच्या हल्ल्यात नुकसान झाले आहे. या हल्ल्यांनंतर रशियाने कुर्स्कमध्ये अनेक रणगाडे आणि रॉकेट लाँचर पाठवले आहेत. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर झेलेन्स्की यांनी रविवारी रशियावरील या हल्ल्याची कबुली दिली.

फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी मोठी अपडेट; निलंबित PSI गोपाळ बदने अखेर पोलिसांना शरण

कूपर रुग्णालयात 'फायर सेफ्टी बॉल' बसवणार; आग प्रतिबंधक तयारी अधिक मजबूत होणार

छठ पूजेमुळे 3 हजार कोटींची उलाढाल; BMC सज्ज

उलवेमध्ये घर खरेदीदारांची फसवणूक प्रकरण : विकासक गोराडिया दाम्पत्याला जामीन मंजूर

स्लीपर बसमधून प्रवास करताय हे लक्षात ठेवा; एसटीची सुरक्षा जनजागृती मोहीम सुरु