खर्ग बेटावर अमेरिकेचा हल्ला; इराणचे सर्व लष्करी तळ उद्ध्वस्त झाल्याचा ट्रम्प यांचा दावा 
आंतरराष्ट्रीय

खर्ग बेटावर अमेरिकेचा हल्ला; इराणचे सर्व लष्करी तळ उद्ध्वस्त झाल्याचा ट्रम्प यांचा दावा

इराणमधील सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या खर्ग बेटावर अमेरिकेच्या लष्कराने सर्वात मोठा हल्ला केला असून तेथे असलेले सर्व लष्करी तळ उद्ध्वस्त केले आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी, हा हल्ला अमेरिकेच्या सेंट्रल कमांडद्वारे केल्याचे म्हटले असून इराणकडून निर्माण होणारा धोका संपुष्टात आणणे हे या हल्ल्याचे उद्दिष्ट असल्याचे म्हटले आहे.

Swapnil S

दुबई : इराणमधील सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या खर्ग बेटावर अमेरिकेच्या लष्कराने सर्वात मोठा हल्ला केला असून तेथे असलेले सर्व लष्करी तळ उद्ध्वस्त केले आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी, हा हल्ला अमेरिकेच्या सेंट्रल कमांडद्वारे केल्याचे म्हटले असून इराणकडून निर्माण होणारा धोका संपुष्टात आणणे हे या हल्ल्याचे उद्दिष्ट असल्याचे म्हटले आहे.

ट्रम्प यांनी सोशल मीडियावर मध्यपूर्वेच्या इतिहासातील सर्वात नमूद केले की, हा हल्ला शक्तिशाली बॉम्बहल्ल्यांच्या मोहिमांपैकी एक होता. अमेरिकन लष्कराने 'खर्ग' बेटावर स्थित असलेल्या सर्व लष्करी तळांना लक्ष्य केले आणि त्यांचा पूर्णपणे विध्वस केला. मात्र, ऊर्जेचा पुरवठा विस्कळीत होऊ नये या उद्देशाने अमेरिकेने बेटावरील तेलविषयक पायाभूत सुविधांना लक्ष्य करणे जाणीवपूर्वक टाळले, असेही त्यांनी स्पट केले.

हॉर्मुझबाबत ट्रम्प यांचा इशारा

ट्रम्प यांनी स्पष्टपणे सांगितले की, जर इराण किंवा अन्य कोणत्याही देशाने हॉर्मुझ सामुद्रधुनीतून प्रवास करणाऱ्या जहाजांच्या सुरक्षित वाहतुकीत अडथळा निर्माण केला, तर अमेरिका आपली भूमिका बदलू शकते. अशा परिस्थितीत, अमेरिका त्या बेटावरील तेलविषयक पायाभूत सुविधांना लक्ष्य करण्याचाही विचार करेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

खर्ग बेटावरील हल्ल्याचा बदला प्रत्युत्तरादाखल इराणचा बगदादमधील अमेरिकेच्या दूतावासावर हल्ला

तेहरान : इराणच्या महत्त्वाच्या खर्ग बेटावर अमेरिकेकडून करण्यात आलेल्या मोठ्या हल्ल्यास प्रत्युत्तर देण्याचा इशारा आता इराणने दिला आहे. त्यानुसार इराणने बगदाद शहरात असलेल्या अमेरिकेच्या दूतावासावर ड्रोनने हल्ले केले आहेत. बगदादमधील सर्वात सुरक्षित क्षेत्र मानल्या जाणाऱ्या ग्रीन झोनमध्ये हे दूतावास होते.

आमच्या तेल पायाभूत सुविधांवर हल्ला झाला तर मध्य पूर्वेत अमेरिकेच्या मालकीच्या किंवा अमेरिकेसोबत सहकार्य करणाऱ्या कंपन्यांच्या ऊर्जा प्रकल्पांवर प्रत्युत्तरात्मक हल्ले केले जातील असा इशारा इराणच्या सशस्त्र दलांनी शनिवारी दिला होता. इराणच्या या हल्ल्यात दूतावासाचे किती नुकसान झाले आहे त्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. या हल्ल्याचे व्हिडीओसमोर आले असून दूतावासातून काळा धूर येत असल्याचे दिसत आहे. इराणच्या ड्रोनने अमेरिकेच्या रडार यंत्रणेला आणि हेलिपॅडलाही लक्ष्य केले.

इराणच्या खातम अल-अंबिया केंद्रीय मुख्यालयाच्या एका प्रवक्त्याने इशारा देताना सांगितले की, तेहरानच्या तेल पायाभूत सुविधांना हानी पोहोचवली गेल्यास या प्रदेशातील अमेरिकेच्या मालकीच्या किंवा अमेरिकेसोबत काम करणाऱ्या कंपन्यांच्या ऊर्जा प्रकल्पांना लक्ष्य केले जाईल. प्रवक्त्याच्या मते, अशा ठिकाणांचा नाश करून त्यांते रूपान्तर राखेत केले जाईल.

खर्ग बेट महत्त्वाचे का ?

इराणच्या दृष्टीने खर्ग बेट अत्यंत मोक्याचे मानले जाते. पर्शियन आखातात वसलेले हे तेल निर्यातीचे एक प्रमुख केंद्र आहे. इराणच्या तेलाचा एक मोठा हिस्सा या ठिकाणावरून जगभरातील विविध देशांना पाठवला जातो. याच कारणामुळे, या बेटाला इराणच्या ऊर्जा पायाभूत सुविधांचे मध्यवर्ती केंद्र मानले जाते. ट्रम्प यांनी नमूद केले की, त्या बेटावरील संपूर्ण तेल पायाभूत सुविधा नष्ट करण्याची क्षमता अमेरिकन लष्कराकडे होती. पण त्यांनी तसे न करण्याचा निर्णय घेतला. जागतिक ऊर्जा पुरवठ्यात व्यत्यय येऊ नये म्हणून त्याचे रक्षण करण्याच्या उद्देशाने तसेच मानवतावादी विचारांतून हा निर्णय घेण्यात आला, असे ट्रम्प म्हणाले.

दोन भारतीय LPG जहाजे होर्मुझमधून भारताकडे रवाना

देशभरात सिलिंडर तुटवडा; पंजाबच्या रांगेत गेला एकाचा जीव; यूपीत रात्रीपासून रांगा, एमपीमध्ये पळापळ, २ हजारांचा सिलिंडर ४ हजारांना

Iran vs US-Israel War : जगातील संघर्ष थांबवण्याची मोदींमध्ये क्षमता - देवेंद्र फडणवीस

सोनम वांगचुक यांची सुटका; केंद्र सरकारचे घूमजाव, रासुकाखालील अटक केली रद्द

ज्येष्ठ तमिळ साहित्यिक वैरामुथू यांना 'ज्ञानपीठ'