संग्रहित छायाचित्र  
आंतरराष्ट्रीय

अमेरिकेचा चीनला पुन्हा दिलासा! अतिरिक्त कर लांबणीवर; ९० दिवसांसाठी पुढे ढकलला निर्णय

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा चीनवर अतिरिक्त कर लादण्याचा निर्णय ९० दिवसांसाठी पुढे ढकलला आहे.

Krantee V. Kale

वॉशिंग्टन डीसी : भारताला टॅरिफचा तडाखा देणाऱ्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनला मात्र दिलासा दिला आहे. ट्रम्प प्रशासनाने पुन्हा एकदा चीनवर अतिरिक्त कर लादण्याचा निर्णय ९० दिवसांसाठी पुढे ढकलला आहे. ट्रम्प यांनी अमेरिका-चीन टॅरिफची अंतिम मुदत ९ नोव्हेंबरपर्यंत वाढवण्याच्या कार्यकारी आदेशावर सोमवारी रात्री स्वाक्षरी केली आहे.

अमेरिकेने लागू केलेली करसवलत मंगळवारी संपणार होती. अमेरिकेने सध्या चीनवर ३० टक्के टॅरिफ लागू केला आहे. अमेरिका आणि चीनमध्ये बऱ्याच काळापासून करयुद्ध सुरू होते. ट्रम्प यांनी चीनवर २४५ टक्के कर लादण्याची धमकी दिली होती. चीननेही अमेरिकेला जशास तसे उत्तर देत, १२५ टक्के टॅरिफ लावण्याची धमकी दिली होती. मात्र, जिनेव्हा व्यापार करारानंतर हे लागू झाले नाही. चीनवर कर लावण्याविषयी ट्रम्प म्हणाले की, “चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी माझे खूप चांगले संबंध आहेत. ते खूप चांगले काम करत आहेत. आता चीनवर किती कर लावला जातो, ते बघूया.”

नवी मुंबई विमानतळावर प्रवासी चाचणी यशस्वी; २५ डिसेंबरपासून उड्डाणांना हिरवा कंदील

राज्यात २० जिल्ह्यांतील नगर परिषद निवडणुका पुढे ढकलल्या; नव्याने अर्ज दाखल करण्याची मुभा, सुधारित कार्यक्रमानुसार २० डिसेंबरला मतदान

संसदेचे हिवाळी अधिवेशन वादळी ठरणार; ‘एसआयआर’वरील चर्चेवर विरोधक ठाम

RBI मोठा निर्णय घेणार! पतधोरणात व्याजदरामध्ये कपात करणार?

आंध्रात ‘दितवाह’ चक्रीवादळामुळे जोरदार पावसाची शक्यता; हवामान खात्याचा इशारा