आंतरराष्ट्रीय

...तर भारताचा 'टॅरिफ' कमी करू! व्हाइट हाऊसचे सल्लागार पीटर नवारो यांचे वक्तव्य

व्हाईट हाऊसचे सल्लागार पीटर नवारो यांनी युक्रेन संघर्षाचा उल्लेख "मोदींचे युद्ध" असा केला आहे. भारताने सवलतीच्या दरात रशियन तेल खरेदी केल्याने रशियाच्या आक्रमकतेला चालना मिळाली आहे आणि अमेरिकन करदात्यांवर त्याचा भार पडला आहे.

Swapnil S

वॉशिंग्टन : व्हाईट हाऊसचे सल्लागार पीटर नवारो यांनी युक्रेन संघर्षाचा उल्लेख "मोदींचे युद्ध" असा केला आहे. भारताने सवलतीच्या दरात रशियन तेल खरेदी केल्याने रशियाच्या आक्रमकतेला चालना मिळाली आहे आणि अमेरिकन करदात्यांवर त्याचा भार पडला आहे. जर भारताने रशियन तेल खरेदी करणे थांबवले तर त्यांच्यावरील २५ टक्के 'टॅरिफ' लगेचच कमी होऊ शकतो, असा दावा नवारो यांनी केला आहे.

एका मुलाखतीत पीटर नवारो यांनी रशिया-युक्रेन संघर्षाचा उल्लेख करत म्हटले की, शांततेचा मार्ग अंशतः नवी दिल्लीतून जातो. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ५० टक्के कर लादला आहे, जो बुधवारपासून लागू झाला आहे. पाश्चात्य दबावाला न जुमानता भारताने रशियन कच्च्या तेलाची खरेदी सुरू ठेवल्याबद्दल भारताला दंड म्हणून इतक्या मोठ्या प्रमाणावर 'टॅरिफ' लादण्यात आले आहे.

अमेरिका भारताशी चर्चा करत आहे का आणि 'टॅरिफ' कमी होण्याची काही शक्यता आहे का, असे विचारले असता नवारो म्हणाले की, हे खरोखर सोपे आहे. जर भारताने रशियन तेल खरेदी करणे थांबवले तर उद्याच त्यांना 'टॅरिफ' मधून २५ टक्के सूट मिळू शकते.

उद्धट वागणे

नवारो भारताच्या 'टॅरिफ' बाबतच्या भूमिकेबद्दल नाराजी व्यक्त करत म्हणाले, माझ्यासाठी त्रासदायक बाब म्हणजे भारतीय याबाबतीत खूप उद्धटपणे वागत आहेत. ते म्हणत आहेत की, आम्ही कुठे जास्त 'टॅरिफ' आकारतो, हे आमचे सार्वभौमत्व आहे. आम्ही ज्याच्याकडून हवे त्याच्याकडून तेल खरेदी करू शकतो.

रशियाला भारताचे बळ

नवारो यांनी भारतावर रशियाच्या युद्ध यंत्रणेला आर्थिक मदत केल्याचा आरोप केला. भारत रशियन तेल सवलतीत खरेदी करतो आणि रशिया यातून आपल्या युद्धयंत्रणेला बळ देऊन युक्रेनियन लोकांना मारतो, असे ते म्हणाले.

रशियाचे अमेरिकेला प्रत्युत्तर

"जर तेल स्वस्त आहे, तर तुम्हीही विकत घ्या. हा भारत आणि आमच्यातील आर्थिक संबंधाचा भाग आहे. यातून युद्धाला कोणताही निधी पुरवला जात नाही. दोन्ही देश आपसातील आर्थिक संबंध यापुढेही कायम ठेवतील", असे रशियाच्या राजनैतिक अधिकाऱ्याने म्हटले आहे. भारताचे पैसे युद्धात वापरले जात नाहीत, हेही त्यांनी स्पष्ट केले.

Maratha Reservation : सलग तिसऱ्या दिवशी वाहतूक विस्कळीत; CSMT परिसरात आंदोलकांचे बस्तान

Maratha Reservation: आंदोलनाची धग वाढणार; मनोज जरांगे आजपासून पाणी पिणेही बंद करणार; एकतर विजययात्रा, नाहीतर अंत्ययात्रा

Maratha Reservation : दक्षिण मुंबईत आज पुन्हा कोंडीची शक्यता

Maratha Reservation : CSMT परिसरात अस्वच्छता; राज्यभरातून अन्नपदार्थांचा ओघ वाढल्याने नासाडी

Maratha reservation protest : सुप्रिया सुळेंना आंदोलकांचा घेराव; गाडीवर बाटल्या भिरकावल्या