अमेरिका-इराण युद्ध भडकले; ट्रम्प यांचे इराणी तळांवर हल्ल्यांचे आदेश, ५ व्या ताफ्यावर इराणचा प्रतिहल्ला (संग्रहित छायाचित्र)
आंतरराष्ट्रीय

अमेरिका-इराण युद्ध भडकले; ट्रम्प यांचे इराणी तळांवर हल्ल्यांचे आदेश, ५ व्या ताफ्यावर इराणचा प्रतिहल्ला

अमेरिकन सैनिकाचा मृत्यू आणि मध्य पूर्वेतील तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका आणि इराणमधील युद्ध अधिकच तीव्र झाले आहे.

Swapnil S

दुबई : अमेरिकन सैनिकाचा मृत्यू आणि मध्य पूर्वेतील तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका आणि इराणमधील युद्ध अधिकच तीव्र झाले आहे. सोमवारी पहाटे अमेरिकेने इराणवर पुन्हा एकदा जोरदार हवाई हल्ले केले, तर त्याला प्रत्युत्तर म्हणून इराणने बहरीन आणि कुवेत या गल्फ (आखाती) देशांना लक्ष्य केले आहे.

गेल्या महिन्यात दोन्ही देशांत झालेला अंतरीम करार मोडीत निघाल्यानंतर परिस्थिती चिघळली आहे. या युद्धाचा फटका जागतिक ऊर्जा पुरवठ्याला बसला असून आंतरराष्ट्रीय बाजारात 'ब्रेंट क्रूड' तेलाचे दर प्रति बॅरल ९० डॉलर पार गेले आहेत. तसेच, हॉरमझच्या सामुद्रधुनीतील जहाजांची वाहतूक जवळपास ठप्प झाली आहे.

अमेरिकन सैन्याच्या सेंट्रल कमांडने दिलेल्या माहितीनुसार, इराणविरुद्धच्या या कारवाईची ही सलग नववी रात्र होती. अमेरिकेने इराणची लष्करी कमांड सेंटर्स, एअर डिफेन्स सिस्टीम, सागरी तळांवर, तसेच क्षेपणास्त्र आणि ड्रोन लॉन्च साईट्सवर थेट निशाणा साधला. तेहरानपासून ५२० किमी अंतरावर असलेल्या तब्रिज शहरावर अमेरिकेने बॉम्बफेक केली, ज्यात किमान एकाचा मृत्यू झाला. या भागात इराणच्या 'रिव्होल्यूशनरी गार्ड्स'चे भूमिगत क्षेपणास्त्र तळ आहेत. याशिवाय खुजेस्तान, होरमोझगान आणि सिस्तान-बलुचिस्तान प्रांतातील किनारपट्टीच्या भागात अमेरिकन हल्ले झाले आहेत.

अमेरिकेच्या हल्ल्यांनंतर इराणने आखाती देशांमधील अमेरिकन तळांवर प्रतिहल्ला सुरू केला आहे. अमेरिकेच्या ९ व्या नौदल ताफ्याचे मुख्यालय असलेल्या बहरीनमध्ये सोमवारी सकाळी क्षेपणास्त्र हल्ल्यांचे सायरन वाजू लागले. कुवेतच्या एअर डिफेन्स सिस्टीमने इराणकडून येणाऱ्या क्षेपणास्त्रांचा हवेतच वेध घेण्याचा प्रयत्न केला.

इराक आक्रमणात जखमी झालेल्या आणखी एका अमेरिकन सैनिकाचा शनिवारी मृत्यू झाला. या घटनेचा संदर्भ देत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, आम्ही रात्री इराणवर पुन्हा एकदा अत्यंत भीषण हल्ला केला आहे.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

रस्त्याच्या कामावरून प्रश्न विचारताच तरुणाच्या लगावली कानशिलात; मंत्री प्रवेश वर्मांचा Video सोशल मीडियावर व्हायरल

NCMC Card : अजून कार्ड काढलं नाही? १ ऑक्टोबरपूर्वी करा नोंदणी; कुठे अन् कशी करायची? वाचा संपूर्ण प्रक्रिया

Video : आशुतोष रांकांसह CJP चे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात; सुटका न झाल्यास आसामला जाणार, अभिजीत दिपकेंचा इशारा

Mumbai : अनंत चतुर्दशीला नाही तर अंगारकी संकष्टीला होते अंधेरीच्या राजाचे विसर्जन; जाणून घ्या खास परंपरा

LPU Students Protest : बलात्काराच्या अफवेने विद्यार्थ्यांचा उद्रेक; कॅम्पसमध्ये जाळपोळ, महामार्गही रोखला, Video