डोनाल्ड ट्रम्प संग्रहित छायाचित्र
आंतरराष्ट्रीय

अमेरिकेतून २०५ भारतीयांची पाठवणी

अमेरिकेत बेकायदेशीरपणे वास्तव्यास असलेल्या जगभरातील नागरिकांवर अमेरिकन सैन्याने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.

Swapnil S

वॉशिंग्टन : अमेरिकेत बेकायदेशीरपणे वास्तव्यास असलेल्या जगभरातील नागरिकांवर अमेरिकन सैन्याने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतल्यानंतर बेकायदेशीर स्थलांतरितांच्या निर्णयावर स्वाक्षरी केल्यावर फक्त ११ दिवसांतच २५ हजारांहून अधिक अवैध स्थलांतरितांना अटक करण्यात आली होती. आता अमेरिकेच्या लष्कराचे सी-१७ हे विमान २०५ भारतीय स्थलांतरितांना घेऊन भारताकडे रवाना झाले आहे, अशी माहिती एका अमेरिकन अधिकाऱ्याने दिली. या प्रवाशांना घेऊन विमानाने भारताच्या दिशेने उड्डाणदेखील केले आहे.

२४ तासांच्या आत हे विमान अमृतसरला पोहोचणार आहे. भारताने अवैध स्थलांतरितांना परत घेण्याबाबत आधीच सहमती दर्शवली होती. जवळपास १८ हजार अवैध भारतीय स्थलांतरितांना परत भारतात आणणार असल्याचे सांगण्यात आले होते. या लोकांनी बेकायदेशीर मार्गाने अमेरिकेत प्रवेश केला होता.

लक्ष्मीपूजनाला वरुणराजाचे 'फटाके'! दिवाळीच्या धामधुमीत मुंबई, ठाणे, नवी मुंबईत अवकाळी पावसाचे धुमशान

दिवाळीच्या सणात पावसाची आतषबाजी; शेतकरी आणि व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान

दिवाळीनिमित्त मोदींचे देशवासीयांना पत्र; स्वदेशी, भाषा, आरोग्य यासह ऑपरेशन सिंदूरचाही केला उल्लेख

राज ठाकरेंच्या दीपोत्सवावर सरकारची जाहिरातबाजी; मनसेची संतप्त पोस्ट, म्हणाले, "आमच्या पक्षाला...

MMR २०४७ पर्यंत बनणार अग्रगण्य शहरी अर्थव्यवस्था; MMRDA चा विश्वास