आंतरराष्ट्रीय

रोगाच्या जनुकांच्या शोधासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर; गुगलच्या डीपमाइंड उपकंपनीला मोठे यश

गुगल डीपमाइंडच्या नवीन मॉडेलने ती टक्केवारी ८९ पर्यंत वाढवली आहे

नवशक्ती Web Desk

वॉशिंग्टन : कोणत्याही रोगावर प्रभावी उपचार करण्यासाठी त्याचे वेळेवर निदान होणे गरजेचे आहे. रोगनिदानासाठी साध्या नाडी तपासण्यापासून ते बॉडी स्कॅनिंगपर्यंत अनेक पद्धती उपलब्ध आहेत. त्यातून झालेल्या रोगाचे निदान होऊ शकते, पण भविष्यात होऊ शकणाऱ्या रोगांचे आधीच निदान करण्यासाठी गुगलच्या डीपमाइंड उपकंपनीने कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर केला आहे. त्यात त्यांना जवळपास ९० टक्के यश मिळाले आहे.

सर्व सजीव डीएनएपासून बनलेले आहेत. डीएनए अॅडेनाइन (ए), सायटोसिन (सी), ग्वानिन (जी) आणि थायमिन (टी) नावाच्या रसायनांच्या चार ब्लॉक्सपासून बनवले जाते. मानवांमध्ये, जेव्हा गर्भ विकसित होत असतो तेव्हा या अक्षरांचा क्रम प्रथिने तयार करण्यासाठी वाचला जातो. प्रथिनेच शरीराचे विविध भाग बनवणाऱ्या पेशी आणि ऊतींचे बिल्डिंग ब्लॉक्स असतात. परंतु आनुवंशिक विकारांसारख्या कारणांनी जर अक्षरे चुकीच्या क्रमाने असतील तर शरीरातील पेशी आणि ऊती योग्यरीत्या तयार होत नाहीत आणि यामुळे रोग होऊ शकतो.

गेल्या वर्षी गुगल डीपमाइंडच्या कृत्रिम बुद्धिमत्ता यंत्रणेने मानवी शरीरातील जवळपास सर्व प्रथिनांचा आकार शोधला. अल्फामिसेन्स नावाची नवीन प्रणाली डीएनएमधील अक्षरे योग्य आकार निर्माण करतील की नाही हे सांगू शकते. तसे नसल्यास, ते संभाव्य रोग-कारक जनुक म्हणून सूचीबद्ध केले जाते. सध्या आनुवंशिक रोगाच्या संशोधकांना मानवी डीएनएच्या कोणत्या भागात रोग होऊ शकतो याचे मर्यादित ज्ञान आहे. त्यांनी ०.१ टक्के अक्षरातील बदल किंवा परिवर्तन, सौम्य किंवा रोग कारणीभूत म्हणून वर्गीकृत केले आहेत. गुगल डीपमाइंडच्या नवीन मॉडेलने ती टक्केवारी ८९ पर्यंत वाढवली आहे. गुगल डीपमाइंडच्या एआय तंत्रज्ञानाने रोगाच्या जनुकांचा शोध वेगवान होऊ शकतो. या शोधामुळे निदानाला गती मिळेल आणि चांगल्या उपचारांच्या शोधात मदत होईल, अशी अपेक्षा आहे.

थेट निवडून आलेल्या अध्यक्षास सदस्यत्व, मताचा अधिकार; अधिनियमातील सुधारणेसाठी अध्यादेश काढणार; राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी

अनिल अंबानी यांना मोठा दिलासा; तीन बँकांच्या कारवाईला कोर्टाची स्थगिती

उद्धव-राज २० वर्षानंतर एकत्र; शिवसेना-मनसे युतीवर अखेर शिक्कामोर्तब! मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले

चेन्नईच्या विद्यार्थ्यांना ‘नासा’चा पुरस्कार; स्वस्त, स्वदेशी इंटरनेटचा प्रकल्प साकारला

इस्रोच्या 'बाहुबली'वरुन ब्लूबर्ड ब्लॉक-२ प्रक्षेपित; मोबाइल नेटवर्कमध्ये होणार बदल