(Photo-X)
आंतरराष्ट्रीय

यूएसएस अब्राहम लिंकन: अमेरिकेची सर्वात विनाशकारी युद्धनौका इराणच्या वेशीवर

‘यूएसएस अब्राहम लिंकन’ ही युद्धनौका शत्रूचा कर्दनकाळ म्हणून ओळखली जाते. ही युद्धनौका इराणच्या संपूर्ण सैन्याला पुरून उरू शकते, असे बोलले जाते.

Swapnil S

वॉशिंग्टन : अमेरिका आणि इराणमधील तणाव सातत्याने वाढत चालला असला तरी इराण चर्चेसाठी उत्सुकता दर्शवत असल्याचे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. मात्र, असे असले तरी, "आमची बोटे ट्रिगरवर आहेत", असा इशारा तेहरानने दिला आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेची सर्वात विध्वंसक युद्धनौका 'यूएसएस अब्राहम लिंकन' इराणच्या वेशीजवळ पोहोचली आहे.

या हालचालींमुळे मोठ्या युद्धाचा भडका उडू शकतो, असे संकेत मिळत आहेत. त्यामुळे ट्रम्प आपली धमकी सत्यात उतरवणार की, हा केवळ इराणवर दबाव टाकण्याचा प्रयत्न आहे, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

‘यूएसएस अब्राहम लिंकन’ ही युद्धनौका शत्रूचा कर्दनकाळ म्हणून ओळखली जाते. ही युद्धनौका इराणच्या संपूर्ण सैन्याला पुरून उरू शकते, असे बोलले जाते. या स्ट्राइक ग्रुपमध्ये गाईडेड मिसाईल्स क्रूझर, विनाशक जहाजे आणि पाणबुड्यांचा समावेश आहे. खरे तर, हा समुद्रात चालणारा सर्वात मोठा जंगी ताफा मानला जातो. अमेरिकेची सर्वात घातक लढाऊ विमाने यावर तैनात असल्याचे बोलले जाते.

तिन्ही प्रकारांची क्षमता

महत्वाचे म्हणजे ही युद्धनौका जल, थल आणि नभ अशा तिन्ही प्रकारांत मोठे नुकसान पोहोचवण्याची क्षमता ठेवते. इराणला नकाशातून पुसून टाकण्याच्या ट्रम्प यांच्या धमकीमागे याच शस्त्रास्त्रांची ताकद आहे. अमेरिकेची ही यंत्रणा इराणचे लष्करी तळ आणि मिसाईल्स साइट्स काही मिनिटांत उद्ध्वस्त करू शकते. एवढेच नाही तर, इराणच्या ‘एअर डिफेन्स सिस्टम’ला अमेरिकन विमाने रोखणे कठीण असल्याचेही तज्ज्ञांचे मत आहे.

इस्रायल अलर्टवर

या पार्श्वभूमीवर कुठल्याही संभाव्य हल्ल्याचा सामना करण्यासाठी आम्ही तयार असल्याचे इराणने म्हटले असून वाढत्या तणावामुळे इस्रायलने 'हाय अलर्ट' जारी केला आहे. याशिवाय, इस्रायली वृत्तपत्र ‘द टाईम्स ऑफ इस्रायल’नुसार, होम फ्रंट प्रशिक्षित आणि सक्षम आहे आणि सैन्य हाय अलर्टवर आहे, असे इस्रायली चीफ ऑफ स्टाफ यांनी म्हटले आहे.

अजित दादा पंचतत्त्वात विलीन! शोकाकूल वातावरणात पार्थ आणि जय पवारांनी दिला मुखाग्नी; शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

Ajit Pawar death : अपघाताची बातमी दादांच्या आईने पाहिली तेव्हा..."मला दादांना भेटायचे आहे!"

'दादा'ला I Love You सांग...; अजित पवारांवर अंत्यसंस्कारापूर्वी बारामती मेडिकल कॉलेजबाहेर कार्यकर्त्याने फोडला हंबरडा, भावूक Video

एका चुकीबद्दल अन्नपाण्याविना केला होता आत्मक्लेश; यशवंतरावांचे स्मृतिस्थळ होते अजितदादांचे शक्तिस्थळ!

Ajit Pawar : विक्रमी सहा वेळा उपमुख्यमंत्री; पण, महाराष्ट्राचे सर्वोच्च पद दूरच...