Viral Video : लग्नाच्या दिवशीच नवरीची चिखलात लोळण! फुलांनी सजवलेली कार थेट शेतात उलटली; पुढे काय घडलं? व्हायरल व्हिडिओवरून घेतलेला स्क्रीनशॉट
आंतरराष्ट्रीय

Viral Video : लग्नाच्या दिवशीच नवरीची चिखलात लोळण! फुलांनी सजवलेली कार थेट शेतात उलटली; पुढे काय घडलं?

लग्नाच्या दिवशी नवरा-नवरीची फुलांनी सजवलेली कार चिखलाने भरलेल्या शेतात उलटली. गर्भवती नवरीचा पोशाख चिखलाने माखला. पुढे काय घडलं? पाहा VIDEO.

Mayuri Gawade

लग्नाचा दिवस प्रत्येकाच्या आयुष्यात खास असतो. सुंदर कपडे, सजवलेली गाडी आणि नव्या आयुष्याची स्वप्नं घेऊन नवरा-नवरी लग्नासाठी निघतात. मात्र, एका जोडप्याच्या लग्नात असं काही घडलं की आनंदाच्या क्षणात सगळ्यांचीच घाबरगुंडी उडाली. फुलांनी सजवलेल्या कारमधून नवरदेवाच्या घरी जात असताना अचानक गाडी रस्त्याच्या खाली उतरली आणि थेट चिखलाने भरलेल्या भातशेतात उलटली. क्षणात नवरीचा सुंदर लग्नाचा पोशाख चिखलाने माखला. विशेष म्हणजे, नवरी गर्भवती असल्याने उपस्थितांची चिंता आणखी वाढली. सुदैवाने, या अपघातातून दोघेही सुखरूप बचावले.

लग्नघर अवघ्या एक किलोमीटरवर अन् घडला अपघात!

व्हीएनएक्सप्रेसच्या वृत्तानुसार, व्हिएतनाममधील तुयेन क्वांग प्रांतात मंगळवारी (दि. १०) सकाळी सुमारे १० वाजता ही घटना घडली. २१ वर्षीय ली व्हान व्हिएत आणि त्याची १९ वर्षीय नवरी डॅम थी झुआन हे लग्नाच्या कार्यक्रमासाठी सजवलेल्या कारमधून नवरदेवाच्या घरी जात होते. त्यांच्यासोबत लग्नाच्या वऱ्हाडातील इतर लोकही होते.

नवरदेवाचं घर अवघ्या एक किलोमीटर अंतरावर असताना अचानक कारचालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटलं. कार रस्त्याच्या कडेला गेली आणि सुमारे एक मीटर खाली असलेल्या चिखलाने भरलेल्या भातशेतात उलटली.

कारवरील फुलांमुळेच अपघात झाला?

या अपघातामागचं कारणही आश्चर्यचकित करणारं आहे. नवरदेव व्हिएत याने दिलेल्या माहितीनुसार, कारच्या पुढील भागावर फुलांची मोठी सजावट करण्यात आली होती. प्रवासादरम्यान जोरदार वारा सुटल्याने ही फुलांची सजावट उडून कारच्या समोरील काचेवर आली. त्यामुळे चालकाला पुढचा रस्ता नीट दिसेनासा झाला आणि कार शेतात उलटल्याचं सांगण्यात येत आहे.

नवरी चिखलात माखली; मदतीसाठी स्थानिक धावले

कार उलटल्याचं पाहताच वऱ्हाडातील लोक मदतीसाठी धावले. सुरुवातीला चार-पाच तरुणांनी कार सरळ करण्याचा प्रयत्न केला. मात्र, कारचं वजन जास्त असल्याने त्यांना यश आलं नाही. त्यानंतर परिसरातील अनेक लोक मदतीला आले. सर्वांनी मिळून कार एका बाजूने उचलली. त्यामुळे नवरा आणि नवरीला कारमधून सुरक्षित बाहेर पडता आलं.

अपघातात नवरीचा लग्नाचा पोशाख आणि केस पूर्णपणे चिखलाने माखले होते. नवरी गर्भवती असल्याने तिला आणि बाळाला काही झालं तर नाही ना, या काळजीने सगळेच घाबरले होते.

चिखल धुतला, कपडे बदलले अन् लग्नही पार पडलं!

सुदैवाने, या अपघातात नवरा-नवरीला कोणतीही दुखापत झाली नाही. त्यानंतर नवरीला नवरदेवाच्या घरी नेण्यात आलं. तिथे तिने अंगावरील चिखल धुतला आणि दुसरा पोशाख परिधान केला. या सगळ्या गोंधळानंतरही लग्नाचे कार्यक्रम नियोजनानुसार पुढे सुरू ठेवण्यात आले.

दरम्यान, दुपारी कुटुंबीयांनी गर्भवती नवरीला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात नेलं. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर नवरी आणि तिच्या पोटातील बाळ दोघेही सुरक्षित असल्याचं सांगितलं.

लग्नाच्या दिवशी घडलेल्या या अनपेक्षित प्रकारामुळे काही काळ सगळ्यांचीच धावपळ झाली. मात्र, मोठा अनर्थ टळल्याने कुटुंबीयांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. फुलांनी सजवलेल्या कारमधून सुरू झालेला प्रवास चिखलात पोहोचला खरा, पण अखेर नवरा-नवरी सुखरूप असल्याने लग्नाचा आनंद कायम राहिला.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : छठपूजेनिमित्त बेस्टची विशेष बससेवा; जुहू बीचवर जाण्यासाठी २२ अतिरिक्त बस, जाणून घ्या मार्ग अन् वेळ

राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चांना अखेर पूर्णविराम; सुप्रिया सुळे यांच्या स्पष्टोक्तीने चित्र स्पष्ट

KEM रुग्णालयात लिफ्ट बंदचे संकट कायम; रुग्णांच्या स्थलांतरानंतर उपचारात अडचणी, ऑर्थोपेडिक विभागाकडून रुग्णांची विभागणी

चिपी-नवी मुंबई विमानसेवा सोमवारपासून नियमित; आठवड्यातील सातही दिवस उड्डाणे; सिंधुदुर्गच्या पर्यटन आणि रोजगाराला मिळणार चालना

Bhayandar : जमिनीबाबत माहिती नाही; वोरांच्या जमीन प्रकरणात मेरवीन फर्नांडिस यांचा पोलिसांना जबाब