हाँगकाँग : चीनने लोकशाही समर्थक उमेदवारांनासहभाग नाकारल्याने हाँगकाँगच्या पहिल्या जिल्हा परिषद निवडणुकीत मतदानाची टक्केवारी ३० टक्क्यांहून खाली घसरली.
रविवारी झालेल्या मतदानात शहरातील ४.३ दशलक्ष नोंदणीकृत मतदारांपैकी २७.५ टक्के मतदारांनी मतदान केले, असे सोमवारी जाहीर करण्यात आले. चीनच्या निष्ठावंतांना रविवारच्या निवडणुकीनंतर जिल्हा परिषदांवर ताबा मिळण्याची अपेक्षा आहे. सरकार समर्थक पक्षांना स्वतंत्र उमेदवार आणि लहान पक्षांपेक्षा जास्त जागा मिळाल्या आहेत. जुलैमध्ये मंजूर झालेल्या दुरुस्तीने थेट निवडून आलेल्या जागांचे प्रमाणही सुमारे ९० टक्क्यांवरून २० टक्क्यांपर्यंत कमी केले. यामुळे नागरिकांचा निवडणुकीतील उत्साह कमी झाला.