आंतरराष्ट्रीय

Walkie-Talkies Explode: लेबेनॉनमध्ये मोबाईलची दहशत, हात लावायलाही घाबरतायेत नागरिक

लेबॅनॉनमध्ये पेजर, वॉकी-टॉकीत झालेल्या स्फोटानंतर सौरऊर्जा यंत्रणेत स्फोट झाले. गेल्या दोन दिवसांत झालेल्या स्फोटांमध्ये ३७ जणांचा मृत्यू झाला असून २३०० जण जखमी झाले आहेत.

Swapnil S

बैरूत : लेबॅनॉनमध्ये पेजर, वॉकी-टॉकीत झालेल्या स्फोटानंतर सौरऊर्जा यंत्रणेत स्फोट झाले. गेल्या दोन दिवसांत झालेल्या स्फोटांमध्ये ३७ जणांचा मृत्यू झाला असून २३०० जण जखमी झाले आहेत. या स्फोटांमुळे नागरिक आता मोबाईलला हात लावायलाही घाबरत आहेत, तर दहशतवादी संघटना हिजबुल्लाहने आपल्या दहशतवाद्यांना फोनमधून बॅटरी फेकून देण्यास सांगितले आहे.

लेबॅनॉनमध्ये इराणसमर्थक हिजबुल्लाह दहशतवादी संघटनेचे समर्थक इस्रायली हॅकिंगपासून वाचण्यासाठी मोबाईल फोनऐवजी पेजर, वॉकी-टॉकी वापरतात, तर राजधानी बैरूत येथे अनेक घरांमध्ये सौरऊर्जा यंत्रणा लावली आहे. हिजबुल्लाहने या हल्ल्याचा आरोप इस्रायलवर ठेवला असून, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने याबाबत शुक्रवारी आपत्कालीन बैठक बोलावली आहे.

इस्रायलचा लेबॅनॉनवर हवाई हल्ला

लेबॅनॉनमध्ये पेजर, वॉकी-टॉकीत झालेल्या स्फोटानंतर इस्रायलच्या हवाई दलाने दक्षिण लेबॅनॉनमध्ये हवाई हल्ले केले. रात्रभर अनेक गावांमध्ये हल्ले सुरू होते. दरम्यान, बैरूतच्या रफीक हरीरी आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवाशांना वॉकी-टॉकी आणि पेजर्स घेऊन जाण्यास मनाई करण्यात आली आहे.

...तर मुख्यमंत्र्यांच्या कारकीर्दीला धोका! मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा इशारा

शक्तीपीठ महामार्ग जमीन संपादनातून कोल्हापूर वगळले; शेतकऱ्यांच्या विरोधानंतर महायुतीचा निर्णय

नृशंस हत्यांचा कळस अन् बेदरकार नेतन्याहू

भाषा मरता देशही मरतो...

आजचे राशिभविष्य, २९ ऑगस्ट २०२५ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत