एक्स @DocStrangelove2
आंतरराष्ट्रीय

चीनने बनवली जगातील सर्वात शक्तिशाली मशीनगन; मिनिटाला साडेचार लाख गोळ्या झाडणार

चीनने जगातील सर्वात शक्तिशाली मशीनगन बनवण्यात यश मिळवले आहे. चीनची नवीन मशीनगन ‘मेटल स्टॉर्म’ ही मिनिटाला साडेचार लाख गोळ्या झाडू शकते.

Swapnil S

बीजिंग : चीनने जगातील सर्वात शक्तिशाली मशीनगन बनवण्यात यश मिळवले आहे. चीनची नवीन मशीनगन ‘मेटल स्टॉर्म’ ही मिनिटाला साडेचार लाख गोळ्या झाडू शकते. त्यामुळे ही मशीनगन जगात सर्वाधिक मारक क्षमता असलेली मशीनगन बनली आहे.

आतापर्यंत जगात सर्वात शक्तिशाली मशीनगन अमेरिकेची ‘फालानक्स सिस्टीम’ आहे. ती मिनिटाला साडेचार हजार गोळ्या झाडू शकते, तर चिनी मशीनगन मिनिटाला साडेचार लाख गोळ्या झाडू शकते. या मशीनगनने हायपरसोनिक क्षेपणास्त्र हवेतच उडवले जाऊ शकते. या गोळ्यांचा वेग प्रतितास ९ हजार किमी आहे. या मशीनगनमध्ये चार व पाच बॅरल लावले जाऊ शकतात. त्यामुळे प्रत्येक बॅरल साडेचार लाख गोळ्या झाडू शकते.

या मशीनगनमध्ये चिनी शास्त्रज्ञांनी कॉन्टक्सलेस इलेक्ट्रॉनिक्स ट्रिगर दिला आहे. या ट्रिगर गोळ्यामुळे धातूची तार वितळू शकते. त्यातून उच्च क्षमतेची ऊर्जा निर्माण होते. त्यामुळेच मिनिटाला साडेचार लाख गोळ्या झाडल्या जाऊ शकतात.

या मशीननग प्रकल्पावर उत्तर चीन विद्यापीठाच्या मॅकेनिकल व इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी विभागाचे सहाय्यक प्राध्यापक लू शुताओ व त्यांचे पथक काम करत आहे. ‘मेटल स्टॉर्म’ मशीनगन ज्या संकल्पनेवर बनली आहे. त्याचा शोध ९० च्या दशकात ऑस्ट्रेलियन शास्त्रज्ञ माइक डायर यांनी लावला होता. त्यांच्या संकल्पनेनुसार, मशीनगनमध्ये ३६ बॅरल लावावे लागले असते. प्रत्येक बॅरलमधून १० लाखांहून अधिक गोळ्या झाडता आल्या असत्या.

"भगवा आणि हिंदुत्वाचा विजय"; मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात निर्दोष ठरल्यानंतर साध्वी प्रज्ञा सिंह यांना अश्रू अनावर

2008 Malegaon Blast : 'दंगलींचे शहर' बॉम्बस्फोटाने काळवंडले! मालेगावच्या इतिहासातील काळा दिवस

"भारत-रशियाने मिळून त्यांची आधीच डबघाईस आलेली अर्थव्यवस्था..."; टॅरिफच्या तडाख्यानंतर ट्रम्प यांचा थेट निशाणा

2008 Malegaon Blast : ठोस पुरावेच नाही! साध्वी प्रज्ञा, पुरोहित यांच्यासह सातही आरोपी निर्दोष, १७ वर्षांनंतर आला निकाल

अमेरिकेचा भारताला तडाखा; भारतीय ‌वस्तूंवर १ ऑगस्टपासून २५ टक्के ‘टॅरिफ’