BRICS Summit 2026 : ‘ब्रिक्स’ साठी जिनपिंग दिल्लीत येणार संग्रहित छायाचित्र
आंतरराष्ट्रीय

BRICS Summit 2026 : ‘ब्रिक्स’ साठी जिनपिंग दिल्लीत येणार

चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग या आठवड्यात नवी दिल्ली येथे आयोजित १८-व्या ब्रिक्स शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी भारत दौऱ्यावर येत असल्याची अधिकृत घोषणा चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी केली.

Swapnil S

नवी दिल्ली : चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग या आठवड्यात नवी दिल्ली येथे आयोजित १८-व्या ब्रिक्स शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी भारत दौऱ्यावर येत असल्याची अधिकृत घोषणा चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी केली. जिनपिंग यांचा गलवान संघर्षानंतरचा आणि तब्बल सात वर्षांनंतरचा पहिलाच भारत दौरा असणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणावरून राष्ट्राध्यक्ष जिनपिंग १२ आणि १३ सप्टेंबर रोजी नवी दिल्लीत होणाऱ्या या परिषदेला उपस्थित राहतील, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी दिली. या दौऱ्यादरम्यान मोदी आणि जिनपिंग द्विपक्षीय चर्चा होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

भारताकडे अध्यक्षपद

सध्या ब्रिक्स गटाचे अध्यक्षपद भारताकडे असून, भारत १२ आणि १३ सप्टेंबर रोजी दिल्लीत या प्रभावशाली परिषदेचे यजमानपद भूषवत आहे. यापूर्वी जिनपिंग यांनी २०१९ मध्ये तामिळनाडूतील मामल्लापुरम (महाबलीपुरम) येथे पंतप्रधान मोदींसोबत झालेल्या अनौपचारिक शिखर परिषदेसाठी भारताचा दौरा केला होता. त्याआधी २०१६ मध्ये गोव्यातील ब्रिक्स परिषदेसाठी आणि २०१४ मध्ये आपल्या पहिल्या कार्यकाळात द्विपक्षीय चर्चेसाठी ते भारतात आले होते.

ब्रिक्सचा अजेंडा

ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका यांचा समावेश असलेल्या या गटाचा २०२४ आणि २०२५ मध्ये विस्तार झाला आहे. यात आता इजिप्त, इथिओपिया, इराण, युएई, सौदी अरेबिया आणि इंडोनेशिया यांचा समावेश आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : कृत्रिम फुलांना पसंतीची मोहोर; चिनी बनावटीच्या फुलांना पसंती, क्रॉफर्ड मार्केटमध्ये खरेदीसाठी झुंबड

Mumbai : विद्यार्थ्यांनी घडवल्या पर्यावरणस्नेही गणेशमूर्ती

Mumbai : ब्रीच कँडीकरांचा ‘बीएमसी फुटपाथ रिपोर्ट कार्ड’; ‘कारवाईची नोंद व जबाबदारी निश्चित करा, रहिवाशांची मागणी

महिला डॉक्टर मारहाण प्रकरण : रमेश म्हात्रेसह इतरांवर न्यायालयात आरोपपत्र

अमेरिकी नागरिकांसाठी डोनाल्ड ट्रम्प यांची ‘रेवडी’