लाईफस्टाईल

आता AI च्या मदतीने आवाजाचीही हुबेहुब नक्कल; परिचिताच्या कॉलवर विश्वास ठेवताना सावधान

सध्याच्या बनावटी जगात विश्वास तरी कशावर ठेवावा अस प्रश्न निर्माण करणारे तंत्रज्ञान सध्याच्या काळात उपलब्ध आहे आणि त्याचा गैरवापरही जोरात सुरू आहे. 'एआय'च्या म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने कुठल्याही व्यक्तीचा हुबेहूब आवाज काढता येतो आणि त्याच वापर करत होणारे स्कॅमही वाढत आहेत.

रवींद्र राऊळ

मुंबई : सध्याच्या बनावटी जगात विश्वास तरी कशावर ठेवावा अस प्रश्न निर्माण करणारे तंत्रज्ञान सध्याच्या काळात उपलब्ध आहे आणि त्याचा गैरवापरही जोरात सुरू आहे. 'एआय'च्या म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने कुठल्याही व्यक्तीचा हुबेहूब आवाज काढता येतो आणि त्याच वापर करत होणारे स्कॅमही वाढत आहेत.

मध्य प्रदेशात एका व्यक्तीला सायबर गुन्हेगाराने कॉल करून त्याच्या किशोरवयीन मुलाला बलात्काराच्या प्रकरणात अटक करण्यात आली असून त्याच्या सुटकेसाठी पन्नास हजार रुपये देण्याची मागणी केली. त्यानंतर त्या स्कॅमरने पीडित व्यक्तीला त्याच्या रडणाऱ्या मुलाचा आवाजही ऐकवला. आपल्या मुलाचा आवाज ओळखून त्या व्यक्तीने तत्काळ पैसे पाठवले. मात्र नंतर तसे काही घडलेच नसल्याचे उघडकीस आले.

एखाद्या व्यक्तीच्या आवाजाचा नमुना घेऊन हुबेहूब त्या आवाजात कोणतेही संभाषण आणि बोलण्याची पद्धत असलेले डीप फेक व्हिडीओ तयार करणारे अनेक टूल सध्या इंटरनेटवर उपलब्ध आहेत. असे एआय व्हाईस क्लोनिंग किंवा व्हाईस चेंजर ॲप आणि टूल्स अगदी मोफत उपलब्ध आहेत.

कुणीही स्कॅमर तुम्हाला कॉल करून तो रेकॉर्ड करू शकतो. त्यामुळे त्याच्याकडे बनावट कॉल करण्यासाठी पुरेसा डेटा उपलब्ध होईल. अगदी राँग कॉलवर बोललात तरी कॉपी करण्यासाठी अगदी तीन सेकंदाचा आवाजही पुरेसा असतो. काही अल्गोरिदमला तर त्याचीही गरज भासत नाही. ऊठसूट सोशल मीडियावर टाकले जाणारे व्हिडीओ ही तर स्कॅमरसाठी पर्वणीच. ते व्हिडीओ स्कॅमरकडून उचलले जातात. एआयद्वारे कुणीतरी तुमच्या मित्राच्या अथवा नातेवाईकाच्या चेहऱ्याचे क्लोनिंग करून व्हिडीओ तयार करू शकतो. त्यात तो अडचणीत असल्याचे सांगत तुमच्याकडे पैशांची मागणी करू शकतो. पहिल्या दृष्टिक्षेपात हे क्लोनिंग ओळखणेही अतिशय अवघड असते. आवाज मिळताजुळता असल्याने लोक सहजपणे या स्कॅममध्ये फसतात. अशावेळी तुम्ही सावध असलात तरच नुकसान होण्यापासून वाचाल. तुमच्या परिचिताचा फोन क्रमांक तुमच्याकडे सेव्ह असेल आणि मित्राने त्या क्रमांकाऐवजी अनोळखी क्रमांकावरून कॉल केला तर लगेच सावध व्हा.

काय कराल?

  • क्रॉस व्हेरीफाय करा : कॉलरची माहिती जाणून घ्या. कॉल कट करून थेट संपर्क साधा

  • प्रश्न विचारा : अनोळखी क्रमांकावरून परिचिताचा कॉल आल्यास त्याच्याशी संबंधित उलटसुलट प्रश्न विचारा

  • ऑथेंटिक ॲप वापरा: कॉलर आयडी दाखवणारे ॲप वापरा

  • व्हिडीओ कॉल तपासा : व्हिडीओ कॉलवर बोलताना परिचिताच्या चेहऱ्याचे आणि हावभावांचे निरीक्षण करा. फरक समजू शकेल.

काय टाळाल?

  • आगंतुक कॉलपासून सावध: अनोळखी क्रमांकावरून आलेल्या कॉलशी बोलण्याचा मोह टाळा.

  • गोपनीयता बाळगा अशा संशयित कॉलवर वैयक्तिक डेटा अथवा आर्थिक माहिती देऊ नका.

  • भावनावश होऊ नका: परिचिताने इमोशनली ब्लॅकमेल अथवा आमिष दाखवल्यास सावध व्हा.

देशात मतदार यादीची झाडाझडती; केंद्रीय निवडणूक आयोगाची तयारी

मद्य परवान्यावरून सरकारचा सावध पवित्रा; विधिमंडळाला विश्वासात घेतल्याशिवाय परवाने वाटप नाहीच -अजित पवार

अंतराळवीर शुभांशू शुक्ला आज पृथ्वीकडे परतणार

जनसुरक्षा कायदा ‘अर्बन नक्सल’विरोधात उपयुक्त ठरेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

विरोधी पक्षनेतेपदासाठी ‘फिल्डिंग’; काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटामध्ये जोरदार रस्सीखेच, 'ही' नावे चर्चेत