लाईफस्टाईल

'ग्रीन टी'ला पर्याय...आवळ्याच्या चहा! रोज प्या... आणि आरोग्याला मिळवून द्या अनेक फायदे

संपूर्ण जगभरात 'ग्रीन टी' एक आरोग्यदायी चहा म्हणून ओळखला जातो, मात्र बहुतेक लोकांना माहीत नाही की 'ग्रीन टी'ला आवळा चहा हा एक आरोग्यदायी आणि उत्तम पर्याय आहे.

Krantee V. Kale


संपूर्ण जगभरात 'ग्रीन टी' एक आरोग्यदायी चहा म्हणून ओळखला जातो, मात्र बहुतेक लोकांना माहीत नाही की 'ग्रीन टी'ला आवळा चहा हा एक आरोग्यदायी आणि उत्तम पर्याय आहे. आवळा चहामध्ये ग्रीन टीपेक्षा अधिक अँटीऑक्सिडंट्स आणि पोषणतत्त्व आहेत, ज्यामुळे आरोग्य सुधारण्यास मदत होते. आवळा चहा हा एक आरोग्यदायक पर्याय आहे, जो शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आणि शरीराला आवश्यक अँटीऑक्सिडंट्स मिळवण्यासाठीही खूप मदत करतो.

आवळा चहा अधिक अँटीऑक्सिडंट्स कसा?

आवळ्यात नैसर्गिकरीत्या मोठ्या प्रमाणावर व्हिटॅमिन C आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. व्हिटॅमिन C हा एक शक्तिशाली अँटीऑक्सिडंट आहे जो शरीरातील हानिकारक मुक्त कण (free radicals) नष्ट करतो आणि रोगप्रतिकारक मजबूत करतो. यामुळे, आवळा चहा ग्रीन टीपेक्षा जास्त प्रभावी आहे.

आवळा चहा कसा बनवावा?

साहित्य:

-१ आवळा (ताजे किंवा सुके)

-१ आलं (साल काढून चिरलेले)

-५-६ पुदिनाचे पान

-१ चमचा ओवा (carrom seeds)

पद्धत:

एका पातेल्यात पाणी उकळा. त्यात आवळा, आलं, पुदिना आणि ओवा उकळत ठेवा, ५ ते १० मिनिटे उकळून झाल्यावर कपात ओता आणि गरमागरम आवळा चहा प्या. इंस्टाग्रामवर शेफ व्यंकटेश भट यांनी आवळा चहाविषयी टिप्स देणारी व आवळा चहा तयार करण्याची एक साधी आणि पौष्टिक रेसिपी शेअर केली आहे, जी ग्रीन टीपेक्षा अधिक फायदेशीर आहे असे त्यांचे मत आहे.

ग्रीन टीपेक्षा का निवडावा आवळा चहा?

ग्रीन टी मध्ये पॉलिफेनॉल्स (polyphenols) असतात, जे मुक्त कणांशी (free radicals) लढतात आणि शरीराच्या सेल्सना हानी होण्यापासून बचाव करतात. पण आवळा चहामध्ये ग्रीन टीपेक्षा अधिक अँटीऑक्सिडंट्स असतात. अँटीऑक्सिडंट्ससोबतच इतर महत्त्वाचे व्हिटॅमिन्स देखील असतात. आवळ्यातील व्हिटॅमिन C शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचे काम करते त्याचबरोबर त्वचेसाठीही अत्यंत फायदेशीर आहे.

कर्ज फेडण्यासाठी कर्ज घेणे हा एक नवा प्रघात; CAG च्या अहवालात ताशेरे

भारत-पाकिस्तान युद्धात ५ विमाने पाडण्यात आली; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा

राज ठाकरे यांच्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका; भाषिक द्वेष पसरविण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप

...तर 'मविआ'त राहण्यात अर्थ नाही; शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा सूचक इशारा

गुगल, 'मेटा 'ला ED ची नोटीस; अवैध ऑनलाईन सट्टेबाजी ॲप प्रकरण