लाईफस्टाईल

परफेक्ट उकडीचे मोदक कसे बनवाल? पारीही फाटणार नाही अन् सारणही बाहेर येणार नाही, फॉलो करा 'या' टिप्स

Angarki Sankashti Chaturthi : २०२६ या नववर्षातली पहिलीच अंगारकी संकष्टी आज आहे. या खास निमित्ताने गणपती बाप्पांच्या नैवेद्याला उकडीचे मोदक असायलाच हवेत. पण अनेकदा मोदक करायला घेतले, की पारी फाटते, सारण बाहेर येतं, कळ्या नीट पडत नाहीत किंवा मोदक वाफवताना चिकटतात. म्हणूनच यावेळी उकडीचे मोदक करताना या सोप्या पण महत्त्वाच्या टिप्स आणि ट्रिक्स नक्की लक्षात ठेवा...

Mayuri Gawade

२०२६ या नववर्षातली पहिलीच अंगारकी संकष्टी आज आहे. या खास निमित्ताने गणपती बाप्पांच्या नैवेद्याला उकडीचे मोदक असायलाच हवेत. मोदकांशिवाय बाप्पाचा नैवेद्य अपूर्ण वाटतो, हे तर आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे. पण अनेकदा उत्साहात मोदक करायला घेतले, की पारी फाटते, सारण बाहेर येतं, कळ्या नीट पडत नाहीत किंवा मोदक वाफवताना चिकटतात. मग मेहनत असूनही अपेक्षित परिणाम मिळत नाही. म्हणूनच यावेळी उकडीचे मोदक करताना या सोप्या पण महत्त्वाच्या टिप्स आणि ट्रिक्स नक्की लक्षात ठेवा.

उकडीचे मोदक परफेक्ट होण्यासाठी खास टिप्स

१) सारण योग्य असणं खूप महत्त्वाचं -

मोदकाचं सारण करताना ओला, पांढराशुभ्र नारळ वापरा. नारळ एकसारखा खोवलेला असावा. गूळ फार चिकट किंवा फार कडक नको; हलका लालसर गूळ वापरल्यास सारण छान लागतं. चवीत भर घालण्यासाठी गूळ–नारळात थोडासा खवा घातला, तर सारण अधिकच स्वादिष्ट होतं.

२) तांदूळांची योग्य निवड करा -

उकडीसाठी शक्यतो आंबेमोहोर तांदूळ वापरा. खूप जाड किंवा साधे तांदूळ घेतले, तर पारी चिकट होते किंवा तुटते. उकड काढताना पाणी अचूक प्रमाणात असणं महत्त्वाचं आहे, म्हणजे पीठ ना फार सैल होईल ना फार घट्ट.

३) मोदकपात्र आधी तयार ठेवा -

मोदक वाफवायच्या आधी किमान ५ मिनिटं मोदकपात्र गॅसवर ठेवून पाणी उकळत ठेवा. मोदक ठेवायच्या चाळणीला किंवा पात्राला केळीचं पान किंवा थोडंसं तेल लावलं, तर मोदक चिकटत नाहीत आणि छान सुगंधही येतो.

४) कळ्या नीट पडत नाहीत? ही ट्रिक वापरा -

अनेकांना मोदकाच्या कळ्या नीट पाडणं जमत नाही. यासाठी छोट्या चमच्याचा वापर करा. उकडीच्या पिठाचा गोळा नीट मळून घेतल्यानंतर चमच्याने हलक्या हाताने कळ्या पाडल्या, तर मोदक सुबक दिसतात.

५) पारी फाटू नये यासाठी…

हाताला थोडंसं तेल लावून पिठाची पारी तयार करा. ती फार पातळ किंवा फार जाड नसावी. पारीत सारण भरल्यानंतर सर्व बाजूंनी नीट बंद करा. वरून हलक्याच हाताने कळीदार आकार द्या.

आणखी काही उपयोगी टिप्स & ट्रिक्स

  • मोदक ठेवताना एकमेकांना चिकटवू नका.

  • वाफवताना मध्यम आचेवर १५ मिनिटं मोदक शिजवा.

  • हळदीच्या पानात मोदक वाफवले, तर चव आणि सुगंध दोन्ही वाढतात.

  • गरमागरम मोदकांवर थोडंसं तूप सोडलं, तर नैवेद्य अधिकच खास लागतो.

यंदाच्या अंगारकी संकष्टीला या टिप्स फॉलो करा आणि घरच्या घरी सुबक, मऊ, कळीदार आणि स्वादिष्ट उकडीचे मोदक नक्की बनवा.

मुंबईत १ लाख झाडे लावण्याचा संकल्पच महापौर रितू तावडे यांच्याकडून हरित मुंबई अभियानाला गती

Navi Mumbai : पाणी बचतीसाठी कठोर उपाययोजना; अपव्यय करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा; वॉशिंग सेंटर, स्विमिंग पूल बंदचे आदेश

'नहीं बोलूंगा मराठी!'; मुंबई सेंट्रल स्थानकावरील चौकशी कक्षात रेल्वे कर्मचाऱ्याची अरेरावी, VIDEO व्हायरल

Ambernath : घरात CCTV लावून ठेवायचा पाळत; लग्नानंतर ४८ दिवसांत विवाहितेची आत्महत्या; डॉक्टर पतीसह तिघांना अटक

मुंबईकरांच्या लोकल प्रवासाला गती मिळणार; प्रकल्पांसाठी 'एमआरव्हीसी'ला हवेत ६४,६४४ कोटी