चेहरा धुताना नेहमी कोमट पाणी वापरा. गरम पाणी त्वचा सुकवू शकते आणि थंड पाणी चेहऱ्याला हानी पोहोचवू शकते. कोमट पाणी त्वचेसाठी सौम्य असते.  प्रातिनिधिक छायाचित्र (संग्रहित)
लाईफस्टाईल

जखमेमुळे काळे डाग पडले आहेत? स्वयंपाक घरातील 'हे' पदार्थ वापरा, पुन्हा उजळेल चेहरा

स्वयंपाक घरातील अनेक पदार्थ हे वेगवेगळ्या आजारावरील औषध असते. विशेष करून अनेक सौंदर्य समस्यांचे समाधान यातून मिळतात. अनेकवेळा आपल्या चेहऱ्यावर किंवा अंगावर एखादी जखम होऊन एखादा व्रण उठतो.

Kkhushi Niramish

स्वयंपाक घरातील अनेक पदार्थ हे वेगवेगळ्या आजारावरील औषध असते. विशेष करून अनेक सौंदर्य समस्यांचे समाधान यातून मिळतात. अनेकवेळा आपल्या चेहऱ्यावर किंवा अंगावर एखादी जखम होऊन एखादा व्रण उठतो. तर कधी चेहऱ्यावर पिंपल्सचे डाग पडतात. हे डाग आपल्या सौंदर्याला कमी करतात. त्यामुळे ते घालवण्यासाठी आपण अनेक वेळा डॉक्टर किंवा ब्यूटी पार्लर गाठतो. मात्र, हे फार खर्चिक पडते. तर स्वयंपाक घरातील काही पदार्थ या समस्या सोडवू शकतात. जाणून घ्या या घरच्या वैद्याबाबत.

बटाट्याची सालं

खरेतर बटाट्याची सालं आपण काढून फेकतो. मात्र, ही फार उपयुक्त असते. बटाट्याच्या सालीत अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात. बटाट्याची सालं जखमेवर चोळल्यामुळे त्याचे व्रण कमी व्हायला लागतात.

लिंबू आणि टॉमॅटोचा रस

लिंबू आणि टोमॅटो हे तर प्रत्येकाच्या घरात असते. त्यामुळे याचा पॅक करू शकता. लिंबाच्या रसात टोमॅटोचा रस एकत्र करून जखमेवरील डागावर लावावा. १५ मिनिटे साधारण हा पॅक तसाच ठेवावा. लिंबातील अॅसिडमुळे जखमांचे डाग बरे होतात.

हळद

हळद हे तर अनेक आजारांवरील औषध आहे. फक्त जखमेचे डागच नाही. तर जखम भरून येण्यासाठी देखील हळदीचा लेप उपयुक्त ठरतो. एक चमचा हळदीत थोडे पाणी घालून ते गरम करावे आणि कोमट असतानाच लावावे. दररोज उपाय केल्यास डाग निघून जातात. याशिवाय हळद आणि लिंबाचा रस एकत्र करूनही तुम्ही पॅक तयार करू शकता.

मेथी दाण्याची पेस्ट

मेथी दाणे रात्रभर भिजवत ठेवा. सकाळी याची पेस्ट तयार करून ही पेस्ट जखमेच्या व्रणांवर लावा. आठवडाभरात फरक जाणवेल.

(Disclaimer: या लेखातील मुद्दे आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. याद्वारे आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

मुंबई, दिल्ली मेट्रो शहरांचा झगमगाट आता संधीच्या नकाशावर मागे! आता Freshers साठी चेन्नई ठरतंय पगाराचा नवा 'हॉटस्पॉट'

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक