प्रातिनिधिक छायाचित्र- X- @dorkymeee
लाईफस्टाईल

Tips To Lighten Dark Lips Naturally: ओठांच्या काळपटपणामुळे उदास आहात? ट्राय करा 'या' सोप्या टिप्स आणि पाहा फरक

चेहऱ्याचं सौंदर्य ओठांच्या सौंदर्यावर निर्भर करते. तुमची त्वचा खूप छान आहे. चेहरा ही चमकतो. पण ओठ जर काळवंडलेले असतील किंवा काळे पडले असतील तर ती एक मोठी सौंदर्य समस्या होऊन बसते. ओठांचा काळपटपणा कमी करण्यासाठी तुम्ही अनेकवेळा मार्केटमधील महागडे प्रोडक्टस विकत घेता. मात्र, त्याचा काही उपयोग होत नाही.

Kkhushi Niramish

चेहऱ्याचं सौंदर्य ओठांच्या सौंदर्यावर निर्भर करते. तुमची त्वचा खूप छान आहे. चेहरा ही चमकतो. पण ओठ जर काळवंडलेले असतील किंवा काळे पडले असतील तर ती एक मोठी सौंदर्य समस्या होऊन बसते. ओठांचा काळपटपणा कमी करण्यासाठी तुम्ही अनेकवेळा मार्केटमधील महागडे प्रोडक्टस विकत घेता. मात्र, त्याचा काही उपयोग होत नाही. परिणामी तुम्ही उदास होता तसेच त्यातून चिडचिड होते. इथे आहेत काही ओठांचा काळपटपणा कमी करण्यासाठी सोप्य टिप्स किमान ९० दिवस या टिप्स ट्राय करा आणि पाहा फरक

चांगल्या गुणवत्तेचा लिप बाम वापरणे.

बदाम तेलाने ओठांना दररोज मालिश करणे. बदामाच्या तेलात खूप पोषक तत्व असतात. ते ओठांचा काळपटपणा कमी करण्यात मदत करतात.

व्हिटामिन ई चे ऑइल देखील ओठांचा काळपटपणा कमी करण्यात खूप मदत करते.

शक्यतो लिप्स्टिक घेताना उत्तम गुणवत्ता असलेली आणि फ्रेश पिस असलेली घ्यावी. खूप जुनी झालेली लिप्स्टिक वापरू नये.

कॉफी पिण्याची सवय कमी करा

कॉफीमध्ये मोठ्या प्रमाणात कॅफिन असते. याचा फार वाईट परिणाम ओठांच्या रंगावर होतो. त्यासाठी कॉफी पिण्याचे प्रमाण कमी करणे तसेच कॉफी पिल्यानंतर ताबडतोब पाण्याने ओठ स्वच्छ करून टिश्यू पेपर किंवा रुमालने हलक्या हाताने पुसण्याची सवय लावून घ्या.

रात्री ओठांची स्वच्छता करणे

दररोज रात्री झोपण्यापूर्वी ओठांची देखील स्वच्छता करणे महत्त्वाचे आहे. रोज रात्री ओठ संत्र्याच्या किंवा लिंबाच्या सालट्याने चांगले स्वच्छ करून नंतर तेलाने मालीश करून मग झोपावे.

जिभेने ओठांना चाटणे बंद करा

अनेकांना जिभेने ओठ चाटण्याची सवय असते. ही सवय ओठांच्या काळपटपणासाठी मोठ्या प्रमाणात कारणीभूत आहे. त्यामुळे ही सवय बंद करायला हवी.

स्मोकिंग सोडणे

स्मोकिंग करताना ओठ निकोटिनच्या संपर्कात येतात. निकोटिनचा परिणाम ओठांवर होऊन ओठ काळे पडतात. त्यामुळे ओठांचा काळपटपणा कमी करायचा असेल तर स्मोकिंग करणे सोडावे लागेल.

आवश्यकतेप्रमाणे पाणी पिणे

ओठांच्या काळपटपणासाठी डिहायड्रेशन हे एक प्रमुख कारण असू शकते. तुम्ही जर कमी प्रमाणात पाणी पित असाल तर डिहायड्रेशनमुळे ओठ काळे पडू शकतात. यासाठी आवश्यक प्रमाणात पाणी पिणे हा उत्तम उपाय आहे.

(Disclaimer: या लेखातील मुद्दे आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. याद्वारे आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक असते.)

IND vs SA : दक्षिण आफ्रिकेचा ऐतिहासिक विजय; भारताचा कसोटी क्रिकेट इतिहासातला मोठा पराभव

Mumbai : 'बॉम्बे'ची 'मुंबई' कधी झाली? काय आहे या नावामागची गोष्ट? जाणून घ्या

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांची हत्या? तुरुंगात विष दिल्याचा आरोप; कुटुंबियांवर लाठीचार्ज

केंद्रीय मंत्र्यांचा 'बॉम्बे' उच्चार; राज ठाकरेंकडून कानउघडणी, म्हणाले, 'मुंबई' नाव खटकतं कारण...

डोंबिवली : भीक मागणाऱ्या तरुणीला दिला आसरा; पाच वर्षांनी केला तिचा खून, खाडीत सुटकेसमध्ये आढळला मृतदेह, धक्कादायक Video समोर