अनेकदा दिवसभर काहीही खाल्लेलं नसतानाही अजिबातचं भुक लागतं नाही, कधी कामाचे टेन्शन तर कधी कधी दररोजच्या कामकाजामध्ये व्यस्त असल्याने देखील भूक लागत नाही. अनेक वेळा जर आपण आजारपणातून नुकतेच उठलो असेल तर आपल्या जिभेला चव येत नाही त्यामुळे कोणतेच पदार्थ खाण्याची इच्छा होत नाही. कधीकधी भूक पण लागत नाही. भूक लागण्यासाठी कोणते उपाय करू शकता आणि त्याची कारणे काय आहेत ते जाणून घेऊया.
कधीकधी काही मानसिक व्याधी सुद्धा यासाठी कारणीभूत असतात. अनेकदा टेन्शन, स्ट्रेस या कारणांचा सुद्धा भुकेवर परिणाम होतो. जर ऑफिसच्या कामाचा जास्त लोड जर आपल्यावर असेल त्यावेळी सुद्धा भूक अजिबात लागत नाही.
जेवण जर वेळेत घेत नसाल किंवा वेळ पाळत नसाल तर अश्या वेळी तुमच्या भुकेचे नियंत्रण राहत नाही.जर तुम्ही योग्य वेळेत जेवण करत नसाल तर मात्र तुमचे वजन हे कमी होऊ शकते. ते आपल्या आरोग्याच्या दृष्टीने योग्य नाही. त्यामुळे दिवसभर थोडे थोडे खात राहा.
भूक लागलेली नसताना समोर जेवणाचे ताट आले तर ते संपवायचे टेन्शन येऊ शकते किंवा कदाचित त्याकडे बघून अजूनच भूक मरू शकते. त्यासाठी चौकस आहार घ्या.
ज्या पदार्थांमध्ये जास्त प्रमाणात कॅलरीज असतात असे पदार्थ खाणे टाळले पाहिजे. कॅलरीजमुळे वाढलेले वजन हे कधीच शरीराला योग्य नसते.
जेवताना तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टी करा. कधीकधी एकट्याने अजिबात जेवण केल्या जात नाही. अश्यावेळी जेवताना शक्यतो चार-चौघासोबत जेवायला बसा.
Note : या लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक आहे. ही माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही. याचे व्यक्तिनुसार भिन्न परिणामही होऊ शकतात. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टरांकडून खात्री करून घ्यावी.